स्वत:ला कवी मनाचा नेता असे म्हणणारा अभिजीत बिचुकले हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’ मराठी सिझन २ मधील स्पर्धक म्हणूनही ओळखले जाते. नुकतंच अभिजीत बिचुकलेने झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नीही सहभागी झाली होती. त्यांचा एक प्रोमो नुकतंच समोर आला आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिजीत बिचुकले त्याच्या पत्नीसह चला हवा येऊ द्या मध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी चला हवा येऊ द्याची टीम त्यांना विविध प्रश्न विचारताना दिसत आहे. नुकतंच सूत्रसंचालक निलेश साबळेने अभिजीत बिचुकलेला पत्नीबद्दल एक खास प्रश्न विचारला होता. मात्र त्याचे उत्तर देताना त्याची तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस १५’ मध्ये एण्ट्री घेणारे अभिजीत बिचुकले नेमके कोण? जाणून घ्या त्यांच्या संपत्तीविषयी

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”

यावेळी निलेश साबळे म्हणतो, “तुम्हाला पहिला प्रश्न आहे की, वहिनींचा आवडता पदार्थ कोणता?” त्यावर अभिजीत बिचुकले ‘मला यावर पर्याय हवेत. नक्की गोड की तिखट.’ यावर निलेश साबळे म्हणतो, “आम्ही पर्याय देऊ शकत नाही. तेवढं तुम्हाला माहिती असायला हवं.” ‘मला माहिती आहे, एक गुलाबजाम आणि दुसरं भरलेलं वांग’, असे अभिजीत बिचुकले उत्तर देताना सांगतो. अभिजीत बिचुकलेचे हे उत्तर चुकलेले असून त्याचे खरे उत्तर ‘आमरस चपाती’ असे असते. यावर निलेश साबळे बिचुकलेला वहिनींना १००० रुपये द्या असे सांगतो.

दरम्यान हा सर्व व्हिडीओ चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चला हवा येऊ द्या च्या या भागात विविध गंमती जंमती पाहायला मिळणार आहेत.

अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले होते. अभिजीत बिचुकले हे ‘बिग बॉस’ मराठी सिझन 2 मधील स्पर्धक म्हणून ओळखले जातात. अभिजीत बिचुकले स्वत:ला कलाकार, लेखक, कवी, गायक आणि कंपोजिशन मेकर असे समजतात. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली होती.