छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धकांनी एण्ट्री केली आहे. यातले स्पर्धक अभिजीत बिचुकले आणि देवोलीना भट्टाचार्जी बऱ्याचवेळा एकत्र दिसतात. मात्र, आता अभिजीतने देवोलीनाकडे किसची मागणी केल्यानंतर ती त्याच्यावर संतापली आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ ‘बिग बॉस १५’च्या एका फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका टास्क दरम्यानचा आहे. यात स्पर्कांना सामानाची चोरी करायची असते. व्हिडीओच्या सुरुवातीला अभिजीत आधी देवोलीनाचे गाल ओढतो आणि बोलतो, “माझ्याकडे खूप सामान आहे. मी तुझ्यासाठी काहीही करेन, पण मला एक किस पाहिजे. हे ऐकल्यानंतर देवोलीना संतापते आणि नाही बोलते. तर अभिजीत बोलतो मी मदत करणार नाही. हे ऐकल्यानंतर देवोलीना त्याच्या चेतावनी देते की माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नकोस आणि तुझी हद्द पार करू नकोस.”

आणखी वाचा : ‘काय विचित्र प्रकार आहे…’, व्हिडीओत पॅन्टचं बटन बंद केल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल

आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट

देवोलीनाने चेतावनी दिल्यानंतर अभिजीत बोलतो की, “मी मस्करी करत होतो.” पण तरी देखील देवोलीना संतापते. यावेळी त्यांच्या भांडणात प्रतीक येतो आणि त्यांना थांबवतो. तेव्हाच तेजश्रीपण तिथे येते आणि देवोलीनाला पाठिंबा देते.

Story img Loader