बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील लूकबद्दल वक्तव्य केलं होतं. “पठाणमध्ये शाहरुख खानने माझ्यासारखा लूक केला आहे” असं विधान त्यांनी नुकतंच केलं होतं यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. आता मात्र महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण यावर अभिजीत यांनी भाष्य केलं आहे.

अभिजीत यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्यापासून ते थेट राष्ट्रपती होण्याचं स्वप्न पाहिलं. आता असेच एक मोठे स्वप्न पाहून त्यांनी स्वतःच्या सौभाग्यवतीलाच राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा विडा हाती उचलला आहे. सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकाही महिलेला मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने बिचुकले यांनी महिला मुख्यमंत्री पदाचा उचललेला मुद्दा महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने चांगलाच चर्चेत आला आहे.

Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
who was pramod mahajan
पत्रकार, भाजपाचे लक्ष्मण ते पंतप्रधानपदाचे दावेदार; कशी होती प्रमोद महाजनांची राजकीय कारकीर्द?

नुकताच अभिजित बिचुकले यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्त त्यांनी आपल्या अर्धांगिनी अलंकृता बिचुकले यांना जाहीर पत्र लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून दाखवल्या. या पत्राचं शीर्षक होतं, “महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री”.

आणखी वाचा : ‘कहो ना प्यार है’मध्ये ‘या’ अभिनेत्याला घेणार होते राकेश रोशन; हृतिक रोशनने सांगितला यामागील किस्सा

याबद्दल पत्रकारांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले, “हे मी प्रथम बोललेलो नाही. ज्यावेळी आमच्या सौभाग्यवती यांनी २००९ मध्ये उदयनराजे यांच्या विरोधात पहिली लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा साताऱ्याच्या पत्रकार परिषदेत मी हे बोललो आहे.” शिवाय स्वातंत्र्य मिळाल्यापासून या क्षेत्रात कायम पुरुषांचीच मक्तेदारी राहिली असंही त्यांनी सांगितलं.

पुढे अभिजीत बिचुकले म्हणाले, “मुख्यमंत्रीपदी जी महिला पाहिजे तिला भारतीय संस्कृतीचं संपूर्ण ज्ञान पाहिजे. संपूर्ण भारतात ती संस्कृती जपणारी आणि पळणारी घरंदाज स्त्री पाहिजे, आणि माझी पत्नी अलंकृता बिचुकले ही महाराष्ट्राचं सौंदर्य, संस्कृती आणि मानसन्मान जपणारी स्त्री आहे. मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाताना हा मुद्दा मांडणार आहे.” शिवाय आत्तापर्यंत बऱ्याच नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं आहे असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. याबरोबरच “सध्या महाराष्ट्राला माझ्याशिवाय पर्याय नाही.” असंही बिचुकले वक्तव्य केलं आहे.