शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आता मंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठल्याने शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडणार का, अशी चर्चा सुरू झाली. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आळंदी येथे माध्यमांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“मी श्रीहरी विष्णुचा मोठा भक्त आहे आणि विठुमाऊली विष्णुचे रुप आहे. शेकडो वर्षांची परंपरा असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मी आलो आहे. संपूर्ण राज्यामध्ये पाऊस बऱ्यापैकी व्हाया यासाठी माऊलींकडे प्रार्थना करेन,” असे अभिजीत बिचुकले म्हणाले.

“विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क नाही, पण…”; एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया

“आता सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. लोकांना जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे राजकारण करत आहेत. माझा शिवसेनेसोबत संबंध नाही. पण आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता. हे बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठे झाले आहेत यामध्ये काही दुमत नाही,” असेही अभिजीत बिचुकले म्हणाले.

विश्लेषण : एकनाथ शिंदे बंड; फुटीर आमदारांवर पक्षांतरबंदी कायदा लागू होणार का?

दरम्यान, नॉट रिचेबल असलेल्या शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Story img Loader