एखाद्या व्यक्तीवर आपण मनापासून आणि अगदी वेड्यासारखं प्रेम करतो तेव्हा त्याला आशिकी असे म्हणतात. आशिकी करताना मैत्री, प्रेम, रोमान्स, भावना, गुंता या गोष्टी प्रत्येकाच्या अनुभवास येतात. प्रेमाची नवीन संकल्पना सांगणारी कथा आगामी सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
गुलशन कुमार प्रस्तुत ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाची निर्मिती टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या सिनेमाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे ही या चित्रपटाचे निर्माते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘व्हॅलेन्टाइन्स डे’ला ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे या नवीन जोडीची रोमँटिक कथा, कथेचा एकंदरीत अंदाज, सुनिल बर्वे, निर्मिती सावंत मित्रांच्या भूमिकेत असलेले करण भानुशाली, स्नेहल बोरकर, स्वामिनी वाडकर आणि सिद्धेश नागवेकर या कलाकारांची एक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

‘प्रेम कधीच इतकं तितकं नसतं… ते एक तर असतं किंवा नसतं’, ‘जे मोजून मापून केलं जात नाही त्यालाच प्रेम म्हणतात’ यांसारखे दमदार संवाद ट्रेलरमध्ये आहेत. स्वयम आणि अमरजाच्या नात्यातील सुंदर आणि मैत्रिपूर्ण क्षण, बँकग्राऊंड म्युझिक, गाणी, लोकेशन्स इत्यादी गोष्टी प्रेक्षकांची या सिनेमाप्रती असलेली उत्सुकता अजून वाढवणार यात शंका नाही.

‘अशी ही आशिकी’ हा चित्रपट १ मार्च २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.