प्रेम, कनफेशन, इमोशन आणि ‘अशी ही आशिकी’; प्रेमात पडणे ते आशिकी करणे हा संपूर्ण प्रवास निराळाच असतो. हाच निराळा प्रवास अनुभवण्यासाठी आणि नवीन वर्षात आशिकी करायला भाग पाडण्यासाठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘अशी ही आशिकी’. गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे साकारत असलेल्या ‘स्वयम-अमरजा’च्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन विषय, नवीन जोडी, चित्रपटाचे नाव आणि प्रेक्षकांच्या भेटीला आलेला टीझर आदी गोष्टी चित्रपटाविषयीची आतुरता वाढवत आहेत. इतकेच नव्हे तर, १४ फेब्रुवारीला व्हॅलेंनटाईन्स डे ऐवजी AHA Day साजरा होणार म्हणजे नेमकं काय हॅपनिंग पाहायला मिळणार याविषयी देखील कुतूहल अनेकांच्या मनात आहे.

स्वयम आणि अमरजा, या जोडीच्या आशिकीची प्रवास जितका चित्रपटातून फुलणार आहे तितकीच त्यांची लव्हस्टोरी गाण्यांतून पण फुलणार आहे. प्रेमात जस-जसे अनेक टप्पे पार पाडावे लागतात, जसे की पहिली भेट, पहिली आठवण वगैरे वगैरे… तसंच काहीसं या प्रेमात पण होणार आहे. स्वयम आणि अमरजाच्या आशिकीची थोडीशी हिंट देण्यासाठी नुकतेच या चित्रपटातील ‘रकम्मा’ हे गाणं डिजीटल मिडीयावर रिलीज करण्यात आले आहे. ‘रकम्मा’ या गाण्यातून आपल्याला या गोष्टीची कल्पना येते की स्वयम निकम्मा होऊन रकम्माला शोधतोय. पण अमरजच्या प्रेमात असलेला स्वयम अचानकपणे रकम्माला का शोधतोय आणि मुळात कोण आहे ही रकम्मा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

Story img Loader