प्रेम, कनफेशन, इमोशन आणि ‘अशी ही आशिकी’; प्रेमात पडणे ते आशिकी करणे हा संपूर्ण प्रवास निराळाच असतो. हाच निराळा प्रवास अनुभवण्यासाठी आणि नवीन वर्षात आशिकी करायला भाग पाडण्यासाठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘अशी ही आशिकी’. गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे साकारत असलेल्या ‘स्वयम-अमरजा’च्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन विषय, नवीन जोडी, चित्रपटाचे नाव आणि प्रेक्षकांच्या भेटीला आलेला टीझर आदी गोष्टी चित्रपटाविषयीची आतुरता वाढवत आहेत. इतकेच नव्हे तर, १४ फेब्रुवारीला व्हॅलेंनटाईन्स डे ऐवजी AHA Day साजरा होणार म्हणजे नेमकं काय हॅपनिंग पाहायला मिळणार याविषयी देखील कुतूहल अनेकांच्या मनात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा