बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनने नुकतेच ‘बँग बँग’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. तसेच, तो आशुतोष गोवारीकरच्या ‘मोहंजोदडो’मध्येही काम करणार आहे. मराठमोळ्या आशुतोषनंतर हृतिकसोबत काम करण्यासाठी नंबर लावला आहे तो म्हणजे अभिनय देवने.
अभिनय आणि हृतिक हे खूप चांगले मित्र आहेत. २००९ सालापासून ते एकत्र काम करणार असल्याची चर्चा होती. पण, काही कारणास्तव हे दोघे एकत्र काम करू शकले नव्हते. मात्र आता देल्ही बेली विनोदी चित्रपट आणि २४ मालिकेचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक अभिनय हा हृतिकसाठी दिग्दर्शन करणार असल्याचे नक्की झाले आहे. खरंतर हृतिकचे वडिल राकेश रोशन यांनीच अभिनयशी संपर्क साधून चित्रपट दिग्दर्शन करण्यास सांगितल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. मात्र, चित्रपटाचा विषय अद्याप ठरविण्यात आलेला नाही. हृतिक सध्या इतर दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे तर अभिनय हा २४ मालिकेच्या दुस-या पर्वावर काम करत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा