बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी अभिषेक-ऐश्वर्याने रविवारी (२० एप्रिल) लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी अभिषेक-ऐश्वर्या बच्चनने सर्वांचे आभार मानले आहेत.
अभिषेक बच्चनच्या ट्विटवरील अधिकृत पेजवर चाहत्यांनी रविवारी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या शुभेच्छांनी भारावलेल्या अभिषेकने स्वतःच्या आणि पत्नी ऐश्वर्याच्यावतीने सर्वांचेच आभार मानले. या दोघांना अडीच वर्षांची आराध्या ही मुलगी आहे. ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर अभि-ऐशची ओळख झाली होती. मात्र, तेव्हा त्यांच्यात केवळ व्यवहारिक संबंध होते. ‘उमराव जान’च्या चित्रीकरणावेळी त्यांनी एकमेकांना डेटिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २००७ साली या प्रेमीयुगुलाने जुहू येथील प्रतीक्षा बंगल्यावर खासगी पद्धतीने विवाह केला.

Story img Loader