बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लाडकी लेक आराध्या देखील चर्चेत असते. दरम्यान, आयफामधला आराध्या, ऐश्वर्या आणि अभिषेकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आराध्याने तिला वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला या विषयी सांगितले आहे.

आणखी वाचा : “साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर दिली प्रतिक्रिया

अभिषेकच्या डान्सचा व्हिडीओ कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिषेक स्टेजवर डान्स करत असल्याचे दिसत आहे. तर ऐश्वर्या आणि आराध्या त्याला सपोर्ट करताना दिसत आहेत. यासगळ्यात मनिष पॉलने आराध्याला वडील अभिषेकचा डान्स कसा होता? असा प्रश्न विचारला यावर उत्तर देत आराध्या ‘खूप सुंदर डान्स होता’, असं म्हणाली.

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

आणखी वाचा : ‘हा’ बोल्ड फोटो पाहू नये म्हणून अभिनेत्रीने वडिलांना केले सोशल मीडियावर ब्लॉक

काही तासांमध्येच त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव झाला आहे. ‘दसवी’ या चित्रपटामध्ये अभिषेक शेवटचा दिसला. अभिनेत्री यामी गौतमने यामध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. अभिषेकचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. सध्या अभिषेक ‘घूमर’ या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.

Story img Loader