बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची लव्ह स्टोरी ही चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती. यानंतर त्या दोघांचे लग्न झाले आणि त्यांना आराध्या नावाची एक मुलगी देखील आहे. या लोकप्रिय जोडीला त्यांच्या मुलीचे नाव ठेवण्यासाठी चक्क ४ महिने लागले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्याने या बद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘आराध्या’चा अर्थ हा उपासनेच्या योग्य असा आहे. या नावाचा त्या दोघांनी प्रचंड विचार केला आणि मग त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे नाव सांगितले. त्यांची मुलगी ४ महिन्यांची झाली हे देखील तिला माहित नव्हते. तिला या गोष्टी लवकर कळल्या नाही.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर राखी सावंत म्हणाली…

आणखी वाचा : रोनित रॉय! कधीकाळी हॉटेलमध्ये धुतली भांडी; आज बॉलिवूड-हॉलिवूड सेलिब्रिटींचं आहे सुरक्षा कवच

ऐश्वर्या आणि अभिषेक हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. दरम्यान, अभिषेक लवकरच ‘दसवी’, ‘बॉब विश्वास’ आणि ‘ब्रीद’च्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार आहे. तर अभिषेकचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट शेअर मार्कटमधील लोकप्रिय स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारीत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan and aishwarya rai bachchan took four months to name daughter aaradhya dcp