बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसणार आहेत. याआधी दोस्ताना या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले होते. फिरोज नाडियादवाला यांच्या ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱया सिक्वलमध्ये जॉन-अभिषेक काम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर या दोघांनीही ‘हेरा फेरी-३’साठी काम करणार असल्याची पुष्टी दिली आहे.
हेरा फेरी ३ चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज वोरा करणार असून यामध्ये सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्याही मुख्य भुमिका असणार आहेत. तसेच ‘हेरा फेरी’चा सिक्वल असलेल्या ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटाची कथा जेथे संपली होती तेथूनच ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या कथेची सुरूवात होणार असल्याचेही समजते. मात्र, यावेळी अक्षय कुमार या सिक्वलमध्ये असणार नाही. चित्रपटाचे चित्रीकरण येत्या जून महिन्यात सुरू होण्याचे अपेक्षित असून ते मुंबई, दुबई आणि लास वेगास येथे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा