बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानला नक्कीच सायकल चालवतानाचे आपले लहानपणीचे दिवस आठवत असणार, त्याला कारणसुद्धा तसेच आहे. शाहरूख खानचा ‘हॅपी न्यू इयर’मधील सहकलाकार अभिषेक बच्चन याने त्याला एक सायकल भेट म्हणून दिली आहे. ही सायकल चालवतानाचे छायाचित्र शाहरूखने सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. “ते म्हणतात सायकल चालवणारा इंजिनसारखा असतो… जीवनातसुद्धा असेच असते. नवीन सायकलसाठी धन्यवाद. लव्ह यू.” असा संदेश त्याने छायाचित्राखाली लिहिला आहे. ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटात एकत्र काम केलेले शाहरूख आणि अभिषेक फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात एकत्र काम करीत असून, सध्या या चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरूखला अपघात झाला होता. परंतु, सायकल चालवत असलेल्या त्याच्या या छायाचित्रावरून तो बरा झाल्याचे जाणवते. शाहरूखला सायकल चालवणे आवडत असून, त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो सायकल चालवतो. काही वर्षांपूर्वी मुलगी सुहाना आणि बहिणीबरोबर मुंबईच्या रस्तांवर तो सायकल चालवताना आढळून आला होता.
अभिषेकने केली शाहरूखला सायकल गिफ्ट!
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानला नक्कीच सायकल चालवतानाचे आपले लहानपणीचे दिवस आठवत असणार, त्याला कारणसुद्धा तसेच आहे. शाहरूख खानचा 'हॅपी न्यू इयर'मधील सहकलाकार अभिषेक...
First published on: 10-02-2014 at 07:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan gifts a bicycle to shah rukh khan