‘हाऊसफुल ३’ चित्रपटानंतर बराच काळ पडद्यावर न दिसलेला अभिनेता अभिषेक बच्चनने चार चित्रपट साईन केले आहेत. यामध्ये जे.पी.दत्ता यांचा ‘पलटन’ आणि प्रभू देवा यांच्या ‘लेफ्टी’ या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र अभिषेकच्या या आगामी प्रोजेक्ट्समध्ये सलमान खान अडथळा ठरतोय.

प्रभू देवाचं दिग्दर्शन असलेल्या ‘लेफ्टी’ चित्रपटाचं शूटिंग जानेवारीपासून सुरु होणार होतं. मात्र त्याआधीच शूटिंगची तारीख लांबली आहे. यामागचे कारण आहे सलमान खान. सलमानच्या आगामी ‘दबंग ३’ चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा प्रभू देवा करणार आहे. प्रभू देवा यांना सध्या ‘दबंग ३’ च्या शूटिंगवर लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि त्याचे शूटिंग पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत सुरु राहणार आहे. अशातच प्रभू देवा ‘लेफ्टी’चे दिग्दर्शन कसे करणार ? जोपर्यंत एक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कामाला ते हात लावू शकणार नाहीत. शिवाय ‘लेफ्टी’च्या स्क्रिप्टवर त्यांना अद्याप काम करायचे आहे. यामुळेच त्या चित्रपटाचे शूटिंग लांबणार असल्याचे चिन्ह सध्या दिसतेय.

जाणून घ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या गाड्यांचे अनोखे नंबर

२०१८ च्या जून किंवा जुलैमध्ये ‘दबंग ३’ च्या दिग्दर्शनाचे काम पूर्ण झाल्यावर प्रभू देवा ‘लेफ्टी’च्या स्क्रिप्टिंगवर काम करणार आहे. या चित्रपटात अभिषेक कपूरची भूमिका अत्यंत अनोखी आहे. एका हाताने काम करणारा एक व्यक्ती शहराला अनेक संकटांपासून कशा प्रकारे वाचवतो हे यात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे काम पूर्ण होण्यास किती काळ लागेल हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. दुसरीकडे जे.पी.दत्ता यांच्या ‘पलटन’ चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरु होणार असल्याचे म्हटले जातेय. याशिवाय अभिषेक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुस्ताखिया’ या चित्रपटातही भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जातेय.

Story img Loader