एखादा कार्यक्रम असो वा पुरस्कार सोहळा ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन मुलगी आराध्यासह तिथे हजेरी लावतात. या तिघांचं एकमेकांवर असणारं प्रेम प्रत्येक फोटो, व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं. नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्याला या तिघांनीही हजेरी लावली होती. यावेळी पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिषेकच्या धमाकेदार डान्सने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – IIFA Awards 2022 : बॉलिवूडसह मराठी अभिनेत्रीनेही ‘आयफा’मध्ये मारली बाजी, पाहा कोणकोण ठरले पुरस्काराचे मानकरी?

आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा अभिषेकचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक त्याच्या ‘दसवी’ चित्रपटामधील ‘मचा मचा’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. डान्स करत असतानाच अभिषेक स्टेजच्या खाली उतरतो. तसेच समोर बसलेल्या ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासमोर डान्स करतो.

आणखी वाचा – VIDEO : “भगवान हूँ मैं”, ‘आश्रम ४’मध्ये नवा ट्विस्ट, उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित

अभिषेकला नाचताना पाहून ऐश्वर्या देखील डान्स करण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही. ती आणि आराध्या देखील या व्हिडीओमध्ये अभिषेकबरोबर नाचताना दिसत आहेत. बच्चन कुटुंबियांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय. त्यांच्या या व्हिडीओला देखील नेटकऱ्यांची अधिक पसंती मिळताना दिसत आहे. तसेच अभिषेकचं पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यवर किती प्रेम आहे हे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

आणखी वाचा – VIDEO : विमानतळावर रणबीर कपूरवर फुलांचा वर्षाव, चाहत्यांची गर्दी अन्…, अभिनेत्याच्या एका गोष्टीने जिंकलं साऱ्यांचं मन

काही तासांमध्येच त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव झाला आहे. ‘दसवी’ या चित्रपटामध्ये अभिषेक शेवटचा दिसला. अभिनेत्री यामी गौतमने यामध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. अभिषेकचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. सध्या अभिषेक ‘घूमर’ या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.