सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तुफान चर्चा आहे. राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही सतत बातम्यांचा विषय ठरत आहेत. या चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. तर यात आता अभिनेता अभिषेक बच्चन यांचं ही नाव समोर आलं आहे.
अभिषेकने नुकतीच टाइम्स नावला मुलाखत दिली. यावेळी अभिषेक त्याचा आगामी चित्रपट दुसवीच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. मुलाखती दरम्यान, चित्रपट आणि राजकारणावर असलेल्या प्रश्नावर म्हणाला, “तुम्ही काश्मीर फाइल्सबद्दल बोलत आहात का? दोन-तीन दिवस आम्ही यावर चर्चा करत आहोत. तुम्ही काहीही बोला, जर तुम्हाला याचे राजकारण करायचे आहे. त्याला धार्मिक रंग द्यायचा आहे. हे तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण, जर चित्रपट चांगला नसता तर बॉक्स ऑफिसवर इतकी चांगली कामगिरी कशी केली असती.”
अभिषेक पुढे म्हणाला, “चित्रपट चांगला आहे, त्यामुळे तो चांगली कामगिरी करत आहे. याशिवाय त्याच्या यशामागे कोणतेही कारण नाही. त्यातून तुम्ही अनेक अर्थ काढू शकता. पण, चित्रपट चांगला असेल तर चालेल, असे या चित्रपटाने दाखवून दिली.” यासोबतच हा आपला वैयक्तिक दृष्टिकोन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उलट, या चित्रपटाचे कौतुक न केलेल्या व्यक्तीला तो अद्याप भेटलेला नाही.
आणखी वाचा : Live Chat दरम्यान पतीच्या कर्करोगाविषयी बोलताना अभिज्ञा भावे झाली भावूक, म्हणाली…
पुढे अभिषेक म्हणाला, “मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही, त्यामुळे मी याबद्दल काहीही बोलू शकत नाही. पण, हा चांगला चित्रपट नाही आहे असे सांगणारा कोणीही मला अजून भेटलेला नाही. हेच चित्रपटाचं सत्य आहे.” विवेक अग्निहोत्रीने अभिषेक बच्चनचे त्याच्या चित्रपटाचे कौतुक ऐकल्यानंतर त्याचे आभार मानले आहेत.