अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली आहे. या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा आजही सोशल मीडियावर रंगताना दिसतात. चित्रपटाच्या सेटवर दोघे प्रेमात पडले आणि नंतर एकमेकांचे आयुष्यभरासाठी साथी झाले. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला १५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जेव्हा अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले तेव्हा त्याने खोटी अंगठी दिली होती.

याविषयी अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते. त्यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्या ‘गुरु’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. दोघे ही शूटिंगमध्ये इतके व्यस्त होते की अभिषेकला अंगठी खरेदी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. यामुळे त्याने ऐश्वर्याला शूटिंगसाठी वापरण्यात येणारी खोटी अंगठी देऊन प्रपोज केले. दरम्यान, टोरंटोमध्ये चित्रपटाच्या प्रीमियरनंतर, अभिषेकने त्याच्या हॉटेल रूमच्या बाल्कनीमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केले होते.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

आणखी वाचा : “२.३० तासात तू दोन महाराजांची…”, प्रवीण तरडे यांच्यासाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट

२००० मध्ये पहिल्यांदा अभिषेक आणि ऐश्वर्याने ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघांच्या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले, तीन वर्षांनी २००३ मध्ये पुन्हा एकदा ‘कुछ ना कहो’ चित्रपटात दोघे एकत्र दिसले. २००५ मध्ये ऐश्वर्याने ‘बंटी और बबली’ चित्रपटात एक आयटम साँग केले होते. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या पसंतीस उतरले. यानंतर ते दोघे ‘उमराव जान’, ‘गुरु’ आणि ‘धूम २’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसले.

आणखी वाचा : “मी झोपडपट्टीत वाढलोय…”, ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचे वक्तव्य चर्चेत

१४ जानेवारी २००७ रोजी मुंबईतील जलसा येथील अभिषेकच्या बंगल्यावर दोघांनी साखरपूडा केला. लग्नानंतर तीन महिन्यांनी २० एप्रिल २००७ रोजी ऐश्वर्याने अभिषेकसोबत लग्न केले. ऐश्वर्या राय वयाने अभिषेकपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर लगेचच दोघे हनिमूनसाठी युरोपला गेले, जिथे त्यांनी जवळपास एक महिना एकत्र घालवला. लग्नाच्या चार वर्षानंतर ऐश्रवर्याने मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे.

Story img Loader