बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याने २००० मध्ये जेपी दत्ता यांच्या रिफ्यूजी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिषेक बच्चनने सिनेसृष्टीत पाऊल ठेवून २० वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. यादरम्यान त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. तर त्याचे काही चित्रपट हे फ्लॉपही ठरले. यामुळे अनेकदा अभिषेकला ट्रोलही केले जाते. नुकतंच अभिषेकने त्याला ट्रोल करणाऱ्या एका नेटकऱ्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

अभिषेक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा विविध ट्रोलर्सला उत्तर देताना दिसतो. नुकतंच अभिषेक बच्चनने ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्याचा एका नेटकऱ्याला फारच मजेशीररित्या उत्तर दिले आहे. एका सोशल मीडिया युजर्सने मीम शेअर केला आहे. या मीममध्ये २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या कामयाब या चित्रपटातील एक फोटो दिसत आहे. हा फोटो संजय मिश्रा यांचा असून त्यावर फोटोशॉप करुन अभिषेक बच्चन यांचा चेहरा लावण्यात आला आहे. या फोटोत अभिषेक बच्चन हा फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे.

या फोटोवर अभिषेकला ट्रोल करण्याच्या हेतूने काही वाक्य लिहिण्यात आली आहेत. “जेव्हा अभिषेकला एका दिग्दर्शकाचा चित्रपटासाठी कॉल येतो, तेव्हा तो विचारतो की तू मला वेड तर बनवत नाहीस ना?” असे या फोटोवर लिहिण्यात आले आहेत. एका नेटकऱ्याने हा फोटो ट्विट करत अभिषेक बच्चनला टॅग केले आहे. त्यासोबत त्याने ‘हे खरं आहे का सर’ असा प्रश्नही विचारला आहे.

त्याला प्रत्युत्तर देताना अभिषेक म्हणाला, “हॅलो मित्रा, मला तुझ्या ट्विटरचा बायो आवडला. काहीही होऊ द्या…पण तुम्ही चांगले राहा. हे अगदीच खरं आहे.” त्यावर त्या नेटकऱ्यानेही ‘धन्यवाद सर, पण तुम्ही बरे आहात ना?’ असे म्हटले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर त्या नेटकऱ्यालाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर किरण मानेंची फेसबुक पोस्ट, म्हणाले “नागराज तू…”

दरम्यान, अभिषेक लवकरच ‘वाशी’ या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. या चित्रपटात Tovino आणि किर्ती सुरेश वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहेत.