एक स्टारकिड असूनही बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याने अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनात घर केले असले तरी त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामान करावा लागतो. एकदा तर भर कार्यक्रमात अभिषेकला पहिल्या रांगेत बसलेला असताना दुसऱ्या एका अभिनेत्यासाठी उठवण्यात आले होते. हा किस्सा स्वत: अभिषेकने सांगितला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिषेकने त्याला चुकीची वागणूक देण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याला न सांगता चित्रपटातून बाहेरचा रस्ता देखील दाखवण्यात आल्याचे त्याने सांगितले. ‘एकदा मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तेही कोणतीही माहिती न देता. जेव्हा मी चित्रीकरणासाठी पोहोचलो तेव्हा पाहिलं तर दुसऱ्याच अभिनेत्यासोबत सीन शूट करणे सुरु होते. ते पाहून मी तेथून निघून गेलो. त्यानंतर मी अनेकांना फोन केले. त्यांनी कुणीही माझे फोन उचलले नाहीत’ असे अभिषेके म्हणाला.
आणखी वाचा : ‘माझे वजन, कंबर आणि ब्रेस्ट साइझ…’, अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
पुढे तो म्हणाला, ‘मी एका मोठ्या कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा मला पहिल्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले होते. पण तेथे जेव्हा एक लोकप्रिय अभिनेता आला तेव्हा मला उठवून मागच्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले. या सर्व गोष्टी तुम्ही पर्सनली घेऊ शकत नाही कारण तो त्या कार्यक्रमाचा एक भागच असतो. हा प्रकार घडल्यानंतर मी घरी आले आणि आता यापुढे आणखी मेहनत घेऊन काम करेन असे ठरवले. मी त्यांच्या पेक्षा मोठा अभिनेता बनेन आणि पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळवेन असे ठरवले होते.’
काही दिवसांपूर्वीच अभिषेकचा ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते. त्यापूर्वी त्याचा ‘द बिग बुल’, ‘लूडो’ आणि ‘मनमर्जियां’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते.