बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिषेक सध्या बॉब बिस्वास या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिषेकने अमिताभसोबतचे काही फोटो कोलाज करून शेअर केले आहेत. यात अभिषेक हा अमिताभ यांच्या सारख्या काही गोष्टी करत असल्याचे दिसते. या फोटोंमध्ये अमिताभ आणि अभिषेक हुबेहुबे दिसत आहेत. हा फोटो शेअर करत वडिलांसारखाच मुलगा! माझी प्रेरणा, असे कॅप्शन अभिषेकने दिले आहे.

त्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत त्या दोघांमध्ये साम्य असल्याचे म्हटले आहे. एक नेटकरी म्हणाला, “तू आणि अमिताभ सर सारखे दिसतात. जरी तुमच्या यशाचे प्रमाण हे कमी जास्त असले आणि ट्रोलर्स तुमच्यात तुलना करत असले तरी तुमच्या कुटुंबात असलेले चांगले संबंध पाहून खरोखर आनंद होतो.” दुसरा नेटकरी म्हणाला, “त्यांनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच यश मिळवले होते, परंतु तुला ते आता मिळेल.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan shares like father like son post for amitabh bachchan fan points out their different success rate dcp