बॉलीवूड किंग शाहरूख खानचा लहान मुलगा अबरामला गाड्यांशी खेळण्याचा नवा लळा लागला आहे. ‘दिलवाले’च्या सेटवर रोहित शेट्टीला भेटेपर्यंत छोटासा अबराम कधीही गाड्यांशी खेळला नव्हता. मात्र, रोहितने त्याला गाड्यांशी कसे खेळायचे हे दाखविल्यानंतर अबरामला आता गाड्यांशी खेळण्याचा लळाच लागला आहे, असे शाहरूख खानने सांगितले. रामोजी फिल्म सिटीत ‘दिलवाले’चे चित्रीकरण सुरू असताना चार दिवस शाहरूख अबरामला त्याठिकाणी आपल्याबरोबर नेत असे. यावेळी अबरामने रोहित शेट्टीबरोबर साधारण अर्धा तास घालवला असेल. या वेळेत रोहितने अबरामला गाड्यांशी कसे खेळायचे हे दाखवले. यापूर्वी अबराम कधीही खेळण्यातील गाडीशी खेळला नव्हता. मात्र, आता माझ्याशी व्हिडिओ चॅटिंग करतानाही अबराम गाड्यांशी खेळण्यात गुंग असतो, हे पाहून मी थक्क झाल्याचे शाहरूखने सांगितले. अबरामला या खेळण्यातील गाड्या कुठून मिळाल्या ते मला माहित नाही. विशेष म्हणजे इतक्या लहान वयात त्याला गाड्यांची बरीच माहिती आहे, इतकेच नव्हे तर त्याला या गाड्यांची नावेही माहिती आहेत. यापूर्वी मी त्याला याप्रकारच्या गोष्टी करताना कधीही पाहिले नसल्याचेही शाहरूख खान म्हणाला. काही दिवसांपूर्वीच अबराम एका आलिशान गाडीतून ‘दिलवाले’चा दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर फेरफटका मारताना नजरेस पडला होता.
शाहरूख खान सध्या हैदराबाद येथे ‘दिलवाले’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. शाहरूख खान आणि काजोलची मोठ्या पडद्यावरील यशस्वी जोडी ‘दिलवाले’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. चित्रपटात वरुण धवन आणि किर्ती सनोन यांच्यादेखील भूमिका आहेत.

Story img Loader