अभिनेता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी आजवर एकाहून एक सरस असे चित्रपट प्रेक्षकांना दिले. ‘कोयला’, करण – अर्जुन’पासून ‘कहो ना प्यार है’ आणि ‘कोई मिल गया’ सारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. सध्या ‘क्रिश ४’ ची चर्चा सोशल मीडियावर होत होती, पण नुकतंच राकेश रोशन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. क्रिश किंवा इतर कोणत्याही चित्रपटावर आपण काम करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबरोबरच त्यांनी ‘सीमा’, ‘मन-मंदिर’, ‘बुनीयाद’, ‘खुबसूरत’ अशा गाजलेल्या चित्रपटातून अभिनयदेखील केला आहे.

इतकी भन्नाट कारकीर्द असूनही राकेश रोशन यांच्या डोक्यावर केस नाहीत किंवा ते विगही वापरत नाही यामागेसुद्धा एक भन्नाट गोष्ट आहे. राकेश यांनी १९८७ मध्ये ‘खुदगर्ज’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. त्यावेळेस त्यांनी तिरूपति मंदिरात नवस केला की हा चित्रपट जर चालला तर ते मुंडन करतील. तो चित्रपट चांगलाच गाजला पण राकेश रोशन आपला नवस विसरले होते. बायकोने आठवण करून दिल्यानंतर राकेश यांनी त्यांचे केस कापले.

सुरुवातीच्या काळात राकेश रोशन यांचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते. त्यानंतर त्यांना एका फॅनने पत्र पाठवून त्यात लिहिलं की यापुढे चित्रपटाचं नाव ‘क’ या अक्षरापासून ठेवा. यानंतर १९८७ मध्ये ‘खुदगर्ज’ सुपरहिट ठरला आणि ‘क’च्या रूपात राकेश रोशन यांना चित्रपट सुपरहिट करण्याचा फॉर्म्युला मिळाला. त्यानंतर त्यांच्या सगळ्या चित्रपटाची नावं याच अक्षरावरून ठेवली गेली आणि ते सुपरहीट झाले.

२००० साली त्यांनी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाच्या माध्यमातून आपला मुलगा हृतिक रोशन आणि अभिनेत्री अमीषा पटेल यांना ब्रेक दिला. हृतिक रातोरात सुपरस्टार झाला. याचदरम्यान बॉलिवूडमध्ये अन्डरवर्ल्डचा हस्तक्षेप वाढला होता. मोठमोठ्या फिल्मस्टार्स तसेच निर्मात्यांना अबू सालेम आणि छोटा शकिल या गँगस्टर्सचे धमक्यांचे फोन यायला सुरुवात झाली.

आणखी वाचा : “बॉलिवूडच्या फिल्ममेकर्सना काय झालंय…?” दिग्दर्शक राकेश रोशन यांनी मांडलं सध्याच्या चित्रपटांबद्दल परखड मत

१० कोटीचं बजेट असलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने ६२ कोटी इतकी कमाई केली होती. यानंतर राकेश रोशन यांना अबू सालेम कडून नफ्यात हिस्सा मिळवण्यासाठी धमक्यांचे फोन येऊ लागले. राकेश यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा याच वर्षी त्यांच्यावर अन्डरवर्ल्डकडून हल्लादेखील करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. अबू सालेमच्या सांगण्यावरून राकेश रोशन यांच्यावर हा हल्ला करवण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी शार्प शूटर्सना अटक केल्यावर ही गोष्ट स्पष्ट झाली.

Story img Loader