साजिद नाडियादवाला ‘कीक’ चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरत आहे. या चित्रपटात सलमान खान प्रमूख भूमिकेत असून, चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी सेटवर अपघात झाला. स्कॉटलंड मधील ग्लासगो येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना, हाणामारीच्या एका प्रसंगात गाडीवरील ताबा सुटल्याने ती एका ऐतिहासीक वास्तूवर जाऊन आदळली. चित्रपटातील सलमान खानचा सह कलाकार रणदीप हुडावर हाणामारीच्या प्रसंगाचे चित्रीकरण होत असताना हा अपघात झाला. या प्रसंगात वापरण्यात आलेल्या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीवर जाऊन आदळली.
ग्लासगो सिटी कौन्सिलनेने चित्रपटाच्या निर्मिती संस्थेशी नुकसान भरपाईबाबत बोलणी करणार असल्येचे म्हटले आहे. त्याचबरोबर, चित्रीकरणाचा स्थानिक जनजीवनावर कमीत-कमी परिणाम होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.
साजिद नाडियादवाला निर्मित या चित्रपटात सलमानबरोबर जेकलीन फर्नांडिस दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2013 रोजी प्रकाशित
‘किक’ चित्रपटाच्या सेटवर अपघात
साजिद नाडियादवाला 'कीक' चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरत आहे. या चित्रपटात सलमान खान प्रमूख भूमिकेत असून, चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी सेटवर अपघात झाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-07-2013 at 06:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident on the sets of salman khans kick