लक्ष्मी अगरवाल हे नाव आता साऱ्यांच्या परिचयाचं झालं आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मीने खचून न जाता, असंख्य पीडितांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. यातूनच तिने तिची नवी ओळख निर्माण केली. त्यामुळे तिच्या कामाची दखल बॉलिवूडने घेतली असून तिच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या लक्ष्मीचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असून तिचा हा व्हिडिओ अभिनेत्री श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी बागी चित्रपटातील ‘मैं नाचूं आज छम छम छम’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यामध्ये लक्ष्मीने श्रद्धाला परफेक्टपणे कॉपी केलं असून तिचा हा डान्स पाहता ती नृत्यात पारंगत असलेल्या नृत्यांगनेप्रमाणे भासत आहेत.

हा व्हिडिओ काही काळातच वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. कमी कालावधीमध्ये या व्हिडिओ १५ लाखापेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत श्रद्धाने काही हार्टचे इमोजी कॅप्शनमध्ये दिले आहेत. तिच्या या इमोजीवरुन तिला लक्ष्मीचा डान्स मनापासून आवडल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, लक्ष्मी अगरवालदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असते. अनेक वेळा ती इन्स्टाग्रामवर काही फोटो, व्हिडिओज शेअर करत असते. लक्ष्मीची संघर्षकथा लवकरच ‘छपाक’ या चित्रपटातून उलगडली जाणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acid attack survivor laxmi dance on shraddha kapoor baaghi song