अजय देवगण-सोनाक्षी सिन्हा यांच्य प्रमुख भूमिका असलेल्या ‘अॅक्शन जॅक्सन’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवासोबत अजय देवगण नृत्याची पोज देताना पोस्टरमध्ये दिसतो.
‘अॅक्शन जॅक्सन’चे दिग्दर्शन प्रभूदेवा करत असून, अजय देवगण पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करत आहे. यामी गौतम आणि कुणाल रॉय कपूर यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. अक्षय कुमारच्या ‘हॉलीडे’ चित्रपटासोबत ६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader