शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शमिता शेट्टी एका पार्टीमधून बाहेर पडताना दिसली होती आणि त्यावेळी तिच्याबरोबर आमिर अली दिसला होती. तो गर्दीतून तिला कारपर्यत सोडायला गेला होता. त्यानंतर शमिता आणि आमिर यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर शमिताने स्पष्टीकरण दिले होते. आता आमिर अलीने व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमिर अली टीव्ही जगतातला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अभिनेत्री संजीदा शेखशी लग्न केले होते. मात्र २०२१ साली ते वेगळे झाले. शमिता शेट्टीबरोबरच्या अफेयरवर त्याने ट्वीट केले आहे. तो असं म्हणाला, मला काय बोलावे कळत नाही. “माझ्या आईने मला नेहमीच सज्जन व्यक्तीप्रमाणे राहायला शिकवले आहे. जर कोणी घरी आले तर मी त्यांना दारात सोडतो, मग ते कोणीही असो. माझी एक मैत्रीण तिथे होती आणि मी तिला तिच्या गाडीत घेऊन गेलो. मी फक्त एक मित्र होतो मात्र वेगळा अर्थ काढला गेला मित्रांनो, आम्ही अविवाहित आहोत. मी अविवाहित आहे, ती अविवाहित आहे. आम्ही फक्त खूप जवळचे मित्र आहोत.”

“दारू आणि ड्रग्सच्या नशेत…” पार्टीतून बाहेर पडताना चेहरा लपवल्याने फरहान अख्तर, अमृता अरोरा ट्रोल

तो पुढे म्हणाला, “एक गोष्ट आहे फक्त, मी असं ऐकले आहे की शाहरुख सरांकडे कोणी पाहुणे आले तर ते त्यांना दरवाज्यापर्यंत सोडतात. ते ठीक आहे मी केले तर… हे फक्त मी सांगत आहे. असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.

आमिर अली आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी यांना एक मुलगी आहे. शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’नंतर राकेश बापटला डेट करत होती. शोदरम्यान दोघांची भेट झाली होती, मात्र आता दोघेही वेगळे झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor aamir ali open up about dating rumour with actress shamita shetty spg