विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. या चित्रपटात अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वच चर्चेचा विषय ठरले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील अनेक पडद्यामागचे व्हिडीओ समोर येत आहेत.

आदिनाथ कोठारेने या चित्रपटात खासदार दौलतराव देशमाने ही भूमिका साकारली होती. यात त्याने लूकपासून बॉडीपर्यंत बरेच कष्ट घेतले. नुकतंच आदिनाथ कोठारेने चंद्रमुखी चित्रपटातील एका खास आणि महत्त्वाच्या दृश्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या पिळदार शरीरयष्टीमागचे नेमकं रहस्य काय? यामागचा खुलासा केला आहे.

“ज्यांनी गेली दोन वर्ष…”, ‘चंद्रमुखी’ चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर अमृता खानविलकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आदिनाथने शेअर केलेल्या युट्यूब व्हिडीओत त्याने कशाप्रकारे पिळदार शरीर कमवलं याबद्दल भाष्य केले आहे. या व्हिडीओत तो म्हणतो की, “‘चंद्रमुखी चित्रपटात दौलत देशमाने हा नदीच्या पात्रात उभं राहून अर्घ्य देतानाचा एक सीन आहे. हा सीन चित्रपटासाठी फार महत्त्वाचा होता. तो सीन हा माझ्या एंट्रीसाठी खास होता. त्या एका सीनसाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.”

“यासाठी मी शैलेश परुळेकर सरांबरोबर मी दिड महिना ट्रेनिंग करत होतो. लॉकडाऊनच काळ असल्याने ऑनलाईन ट्रेनिंगही सुरु होती. तसेच शूटिंगच्या पंधरा दिवस आधी मी जिममध्ये जाऊन ट्रेनिंग घेतले. या चित्रपटात इतर सीनमध्येही माझी पिळदार शरीरयष्टी दिसते. पण त्याची खरी मजा ही पहिल्याच सीनमध्ये आहे. दौलतरावांचे भारदस्त व्यक्तिमत्त्वचा अंदाज हा या चित्रपटातील एका सीनमुळे येतो. त्याचे सर्व श्रेय मी शैलेश परुळेकर यांना जाते”, असेही तो म्हणाला.

Video : ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर अमृता खानविलकर तुळजाभवानीच्या चरणी, म्हणाली “प्रमोशनच्या गडबडीत…”

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली होती. सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळाले. तसेच याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट आहे. तसेच जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरला.