मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या अनेक चित्रपटांचे सिक्वेल येत्या काळात प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने तो सतत त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. यामध्ये ‘दे दे प्यार दे – २’ आणि ‘सन ऑफ सरदार – २’ या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. तर त्याच्या चौथ्या चित्रपटाचे ‘रेड – २’ चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. अभिनेता अजय देवगणचा २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘रेड’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता.

हेही वाचा >>> Phir Aayi Hasseen Dillruba Review : रंगतदार चढती भाजणी

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
veer pahariya varun dhawan body double bhediya
वरुण धवनच्या ‘या’ सिनेमात बॉडी डबल म्हणून केलं काम, आता मुख्य भूमिकेत पदार्पण करणार ‘हा’ अभिनेता

अजय देवगणच्या पात्रातील प्रामाणिकपणा आणि त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. म्हणूनच निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग करण्याचे ठरवले. त्यानुसार ‘रेड – २’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित करण्याचे निर्मात्यांनी ठरविले. परंतु, रोहित शेट्टी दिग्दर्शित अजयच्याच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर ‘रेड २’ च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाल्यामुळे ‘सिंघम अगेन’ हा चित्रपटाच्या जो १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, तो आता दिवाळीच्या आसपास १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘रेड – २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढील वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आली आहे. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड – २’ या चित्रपटाची निर्मिती टी-सिरीजतर्फे करण्यात आली आहे. तर, या चित्रपटात अभिनेता अजय देवगणसह अभिनेत्री वाणी कपूर आणि खलनायकाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे.

Story img Loader