आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर एकीकडे बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरू आहे तर एकीकडे ब्रह्मास्त्र पाहायला लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच याविषयी नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या. चित्रपटाचं बुकिंग आधीच जोरदार झालं होतं. नुकतीच या चित्रपटाने जगभरातून २०० हून अधिक कोटी कमावल्याची बातमी समोर आली आहे.
आणखी वाचा : “मला माफ करा…” अखेर आलिया भट्टने मागितली जाहीर माफी
प्रेक्षक, समीक्षक यांच्या या चित्रपटाच्या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतल्या लोकांनीदेखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. हृतिक रोशन, नीतू कपूर अशा नावाजलेल्या कलाकारांनी ‘ब्रह्मास्त्र’चे कौतुक केले. आता त्यापाठोपाठ अभिनेता अक्षय कुमार यालाही ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट आवडल्याचे त्याने सांगितले आहे.
अक्षय कुमारने चित्रपटाचे कौतुक करण्यासोबतच या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मौनी रॉयचेही कौतुक केले आहे. अक्षयला या चित्रपटातील मौनीचे काम प्रचंड आवडले. तिचा अभिनय त्याला अतिशय नेत्रदीपक वाटला. तो म्हणाला, “अशीच प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडत राहा मौनी.”
हेही वाचा : “चित्रपट सुरू झाला की…” ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाबद्दल नीतू कपूर यांनी दिली प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट जगभरात ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रमी कमाई केली. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एकत्र काम केलं आहे.