हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते अल पचीनो तीन महिन्यांपूर्वी चौथ्यांदा बाबा झाले होते. ८३ वर्षीय अल पचीनो यांच्या २९ वर्षीय गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाहने तीन महिन्यांपूर्वी बाळाला जन्म दिला होता, त्यानंतर आता हे जोडपं विभक्त झालं आहे. नूरने लॉस एंजेलिसमध्ये कायदेशीर कागदपत्रे दाखल करून मुलाची पूर्ण कस्टडी तिला देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात ‘द ब्लास्ट’ने माहिती दिली आहे. तसेच अल पचीनो यांना वाजवी कारण असेल तरंच मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी आपली इच्छा असल्याचं नूरने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जवान’ची नागपूर पोलिसांना भुरळ, शाहरुख खानचे विविध लूक शेअर करत म्हणाले, “जेव्हा तुम्ही असे पासवर्ड…”

नूरने न्यायालयाला सांगितलं की ती स्वेच्छेने त्यांच्या बाळाचा संयुक्त कायदेशीर कस्टडी देईल जेणेकरून अल पचीनो बाळाचे शिक्षण, धर्म, वैद्यकीय उपचार आणि इतर गोष्टींवर मत देऊ शकेल. कायदेशीर फायलिंगमध्ये असं दिसून आलंय की नूरने ‘पालकत्वाची स्वैच्छिक घोषणा’ नावाचा एक दस्तऐवज कोर्टात दिला आहे. ज्यावर त्यांच्या मुलाच्या जन्माच्या सहा दिवसांनंतर नूर आणि अल दोघांनी स्वाक्षरी केली होती. त्यावर थर्ड पार्टी साक्षीदारानेही सही केली होती आणि अल यांनी ते बाळाचे वडील असल्याचे कबूल केले होते.

कसा आहे शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत ‘जवान’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले…

नूरने विनंती केली की अल यांनी तिच्या वकिलाची फी आणि केसशी संबंधित इतर खर्चासाठी पैसे द्यावे, परंतु बाळासाठी विशिष्ट रकमेचा उल्लेख केला नाही. कायदेशीर कागदपत्रांमध्ये असं म्हटलं आहे की न्यायालय मुलाच्या सपोर्टसाठी कोणत्याही पक्षाला पुढील सूचना न देता कमाईची असाइनमेंट जारी करण्याचे आदेश देऊ शकते.

Video: ‘जवान’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ; तिकीट खरेदीसाठी रात्री २ वाजता चित्रपटगृहाबाहेर गर्दी, पाहा व्हिडीओ

दरम्यान, नूर व अल एप्रिल २०२२ पासून एकत्र होते. त्यांनी करोनाकाळात एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. अल यांचे आतापर्यंत हाय-प्रोफाइल रिलेशनशिप्स राहिलेत, पण त्यांनी कधीही लग्न केले नाही, अभिनेत्याने लग्न न करण्याचे कारण कधीच उघड केले नाही. ‘सेंट ऑफ ए वुमन’, ‘हीट’, ‘सर्पिको’, ‘सी ऑफ लव’, ‘द डेविल्स एडवोकेट’, ‘द इनसाइडर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये पचीनो यांनी काम केलं आहे. त्यांना तीन मुले आहेत. पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड जन टॅरंट पासून त्यांना ३३ वर्षांची जुली मॅरी नावाची मुलगी आहे. शिवाय त्यांची आणखी एक पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड बेवर्ली डी एंजेलोपासून त्यांना दोन जुळी मुलं आहेत. १९९७ ते २००३ पर्यंत बेवर्ली व पचीनो रिलेशनशिपमध्ये होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor al pacino and noor alfallah separated 3 months after birth of baby boy hrc
Show comments