अभिनेता अल्लू अर्जुन म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार. सध्या तो त्याच्या आगामी ‘पुष्पा-२ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने त्याला एक वेगळी ओळख दिली. तर त्याचबरोबर त्याचा चाहतावर्गदेखील खूप वाढला. आज तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे. तर ‘पुष्पा २’साठी देखील त्याने मोठं मानधन आकारल्याचं समोर आलं आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पुष्पा’ सुपरहिट झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला. तर याचबरोबर अल्लू अर्जुनचा या चित्रपटातील लूकही सर्वांसमोर आला. सध्या तो या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’साठी प्रचंड मेहनत घेत आहे. या मेहनतीसाठी त्याने मोठं मानधन आकारलं आहे.

आणखी वाचा : Pushpa 2 Teaser: दंगली, जाळपोळ, पुष्पाचा शोध अन्…; ‘पुष्पा २’चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार ‘पुष्पा’ चित्रपट तुफान हिट झाल्यानंतर ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने दुप्पट मानधन आकारलं आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा ‘पुष्पाराज’ ही भूमिका साकारण्यासाठी अल्लू अर्जुनने तब्बल ८५ कोटी फी घेतली आहे. इतकी मोठी रक्कम एका चित्रपटासाठी आकारून त्याने दक्षिणात्य सिनेसृष्टीत एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे असं बोललं जात आहे. पण अद्याप अल्लू अर्जुनचा या चित्रपटातील मानधनाबाबत निर्मात्यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

हेही वाचा : महागड्या गाड्या, आलिशान घर अन्…; ‘पुष्पा’ खऱ्या आयुष्यात आहे ‘इतक्या’ संपत्तीचा मालक, आकडा वाचून व्हाल थक्क

दरम्यान, ‘पुष्पा २’ हा चित्रपट पहिल्या भागापेक्षाही ग्रँड असणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या टीझरमध्ये ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर यामुळे शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सर्वांना एकाच प्रश्न पडला आहे की “पुष्पा कुठे आहे?” या उत्कंठावर्धक टीझरनंतर प्रेक्षकांच्या मनातली चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. हा चित्रपट २०२३ च्या शेवटी किंवा २०१४ च्या सुरुवातीला प्रदर्शित होईल असं बोललं जात आहे.