महाराष्ट्राचे लाडके आराध्य देवत म्हणजेच गणपती, आजपासून कोणाकडे दीड दिवस तर कोणाकडे पाच, सात, दहा दिवसांसाठी सुखकर्ता विराजमान होणार आहे. करोना काळ बघता प्रत्येक जण योग्यती काळजी घेऊन गणेश उत्तसव साजरा करणारी आहे. मराठी कलाकार देखी घरी गणेश उत्सव पर्यावरणाला अनुकूल होईल असा साजरा करतात. काही कलाकार असे आहेत जे बाहेरून मूर्ती घेऊन येच्या ऐवजी ते घरी स्वता:च्या हाताने घडवतात. छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ पण या यादीत सामील झाला आहे.
नाटक, मालिका चित्रपट आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमातून अमेय प्रेक्षकांचे मनोरंज करत आहे. अमेयने यंदा गणपती बाप्पाची मूर्ती स्वता:च्या हाताने साकारायचा प्रयत्न केला आहे आणि तो कसा याचा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कला अमेयने ही रील शेअर करत कॅप्शन दिलं, “जी शक्ती आपलं आयुष्य घडवते …. तीची मूर्ती घडवायचा प्रयत्न! आमच्या शेजारी चारू रसाळ यांनी मार्गदर्शना केले आहे.” अमेयने या रीलमध्ये गणपतीची मूर्ती कशी साकारली आहे हे सुरूवातीपासून सांगितले आहे. शेवटी मूर्ती तयार झाल्यावर त्याचे फोटो पण शेअर केले आहेत. अमेयने ही रील शेअर करताच चाहते कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसंच या रीलला हजारोंच्या संखेत लाइक्स ही मिळत आहेत. अमेयने केलेला हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
आजच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अमेयने देखणी गणेशाची मूर्ती घडवली आहे. अमेय सोबत इतर अनेक कलाकार घरच्या घरी गणेशाची मूर्ती घडवतात.