आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. आमिरच्या गेल्या काही वर्षातल्या करियरमधला हा सर्वात फ्लॉप चित्रपट मानला जात आहे. आमिर त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’साठी ओटीटी प्लॅटफॉर्मशी झगडतो आहे. ‘लाल सिंह चड्ढा’च्या डिजिटल हक्कांसाठी खूप जास्त किंमत सांगितल्याने आमिर आणि नेटफ्लिक्समधला करार रद्द झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा आमिरने नेटफ्लिक्सशी करारासंदर्भात बोलणी करायला सुरुवात केली असल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : मलायका अरोरा – अरबाज खान पुन्हा येणार एकत्र ? फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘बॉलिवूड हंगामा’ या मनोरंजनविश्वाशी निगडीत असलेल्या साईटच्या बातमीनुसार, आमिर खानने ‘लाल सिंग चड्ढा’च्या करारासंदर्भात नेटफ्लिक्सशी फिस्कटलेली बोलणी पुन्हा एकदा सुरु केली आहेत. तसेच यावेळी आमिर खान आणि नेटफ्लिक्स हा रद्द करण्यासाठी सुवर्णमध्य शोधण्याकडे भर देणार आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ भारतात जरी अपयशी झाला असला तरी परदेशात या चित्रपटाने चांगली कमाई केली असल्याने नेटफ्किक्सने हा चित्रपट खरेदी करण्यासाठी रस दाखवले आहे. ‘लाल सिंग चडढा’ची परदेशातील कमाई ही ‘गंगुबाई काठीयावाडी’, ‘भूल भुलैय्या 2’पेक्षा जास्त असल्याने नेटफ्लिक्सने हा चित्रपट खरेदी करण्याला होकार दिला आहे.

परंतु आमिर खानने मागितलेली १२५ कोटींची रक्कम द्यायला नेटफ्लिक्सने अजून मंजुरी दिलेली नाही, तसेच नेटफ्लिक्सने सुरुवातीला मागितलेली ८० कोटी रक्कम आमिरने मंजूर केलेली नाही. त्यामुळे यातील सुवर्णमध्य काढून हा चित्रपट ८० कोटी ते १२५ कोटीच्यामध्ये नेटफ्लिक्स विकत घेईल असे म्हटले जात आहे. तसेच हा चित्रपट प्रदर्शनाच्या आठ आठवड्यांनी ओटीटीवर रिलीज करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.

हेही वाचा : ‘लाल सिंग चड्ढा’बाबत बोलणं जितेंद्र आव्हाडांना पडलं महागात, ट्वीट करताना चूक झाली अन्…

आमिरच्या मनात सुरुवातीपासूनच ‘लाल सिंग चड्ढा’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित व्हावा अशी इच्छा होती. कारण त्याच्या चित्रपटाला एक चांगला प्रेक्षकवर्ग मिळेल आणि त्यामाध्यमातून साऱ्या जगापर्यंत हा चित्रपट पोहोचेल असं आमिरला वाटत होतं. आमिरने नेटफ्लिक्सच्या लोकांशी बोलाचाली सुरुवात केली तेव्हा त्याने सुरुवातीला या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने १५० करोड रुपये द्यावेत अशी मागणी केली होती. याबरोबरच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर किमान ६ महीनेतरी ओटीटीवर येणार नाही यावर आमिर अडून होता. या सगळ्या गोष्टीवरून नेटफ्लिक्सने आमिरला फक्त ८० ते ९० कोटी देण्याचीच तयारी दर्शवली. पण चित्रपट भारतात सुपरफ्लॉप झाल्यावर नेटफ्लिक्सने ५० कोटी एवढीच रक्कम देणार असं म्हटलं, तरी आमिर १२५ कोटी या आकड्यांवर अडून राहिला. नेटफ्लिक्सला ही किंमत जरा जास्तच वाटली. यामुळेच आमिर आणि नेटफ्लिक्समधला हा करार आधी रद्द झाला होता.

Story img Loader