बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. पण तुम्हाला माहितीय का? अमिताभ बच्चन यांच्या नावात एक वेगळाच किस्सा दडला आहे.

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. ७० ते ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या. पण अमिताभ बच्चन यांचे नाव जन्मापूर्वी वेगळे होते. कालांतराने त्यांनी त्यात बदल केला, असे अनेकदा सांगितले जाते. मात्र नुकतंच या मागचा किस्सा समोर आला आहे.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

aishwarya rai nimrat kaur abhishek bachchan
ऐश्वर्या राय बच्चनने पती अभिषेकसाठी केली पोस्ट, चाहते निम्रत कौरचा उल्लेख करत म्हणाले…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Tillotama Shome is bachchan family daughter in law
जया बच्चन यांची सून आहे ‘ही’ अभिनेत्री, २ वर्षे तुरुंगात कैद्यांबरोबर राहिली, आता आहे OTT क्वीन
aishwarya rai bachchan tried avoiding eye contact with ex boyfriend vivek oberoi
बच्चन घराण्याची सून झाल्यावर एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉयला पाहून ऐश्वर्या राय झालेली अस्वस्थ, नेमकं काय घडलेलं? वाचा…
Aaradhya Bachchan
ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; नेमकं प्रकरण काय?
Jaya Bachchan News
Jaya Bachchan : जया बच्चन यांचं वक्तव्य, “महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले आणि…”
Samay Raina Asks Amitabh Bachchan For Property Mein Hissa
अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ डायलॉग अन् समय रैनाने मागितला संपत्तीत हिस्सा, केबीसीतील व्हिडीओ तुफान व्हायरल
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”

माझे नाव कधीही इन्कलाब नव्हते

अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये झाला. त्यांचे नाव जन्मापूर्वी इन्कलाब श्रीवास्तव असे होते. पण त्यानंतर त्यांचं हे नाव बदलून अमिताभ असं ठेवण्यात आलं. काही वर्षांपूर्वी कौन बनेगा करोडपतीच्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नावाची संपूर्ण गोष्ट सांगितली होती. यावेळी बिग बी यांनी त्यांचे नाव लहानपणापासून अमिताभ असल्याचे सांगितले. माझे नाव कधीही इन्कलाब नव्हते. ती फक्त एक अफवा आहे.

माझे नाव अमिताभच

“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १९४२ च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान माझा जन्म झाला. त्यावेळी रोज शहरात आंदोलन व्हायची आणि लोक रस्त्यावर येऊन इन्कलाब झिंदाबाद अशा घोषणा द्यायचे. त्यावेळी माझी आई ८ महिन्यांची गरोदर होती. ती पण एका मिरवणुकीत सहभागी झाली होती. त्यावेळी घरातल्यांना याबद्दल समजल्यानंतर त्यांनी तिला घरी आणले होते. त्यावेळी माझ्या वडिल्यांच्या एका मित्राने जर तुम्हाला मुलगा झाला तर त्याचे नाव इन्कलाब असे ठेवा, असे गंमतीत सांगितले होते.

त्यानंतर सर्वत्र अमिताभ बच्चन यांचे खरे नाव इन्कलाब असल्याची चर्चा रंगते. माझे नाव अमिताभ असण्यामागचे कारण म्हणजे ज्या दिवशी माझा जन्म झाला, त्याच दिवशी सुमित्रानंदन पंत अलाहाबादला राहायला आले होते. त्यांना पाहून माझे नाव अमिताभ बच्चन असे ठेवण्यात आले.” अमिताभ म्हणजे असा प्रकाश जो कधीही कमी होत नाही.

आणखी वाचा : Exclusive Video : “ते तरी…” केसांवर होणाऱ्या विनोदावर समीर चौगुले स्पष्टच बोलले

अमिताभ बच्चन यांच्या आईमुळे त्यांची पावलं रंगभूमीकडे वळली आणि याच जोरावर ते मुंबईमध्ये आले. या कालावधीमध्ये त्यांना वडिलांकडून साहित्याचाही मोठा वारसा मिळाला होता. अमिताभ यांनी मुंबई गाठल्यानंतर ‘भुवन शॉ’, ‘सात हिंदुस्तानी’ हे त्यांच्या कारकिर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट होते. त्यानंतर ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेष म्हणजे हे सारेच चित्रपट त्याकाळी प्रचंड हिट ठरले. या सगळ्या चित्रपटांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण, आणि वाढती गुन्हेगारी याचे चित्रण झाले. त्यामुळे अमिताभ हिंदी चित्रपटसृष्टीतील एका नव्या प्रवाहाला निमित्त ठरले.

Story img Loader