खासदार अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याते दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नेहमी राजकीय पोस्ट शेअर करत चर्चेत असणारे अमोल कोल्हे आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. अमोल यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अमोल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अमोल हे जीम मधून असल्याचे दिसते आहेत. या व्हिडीओत अमोल क्रॉसफीट वर्कआऊट करत असल्याचे दिसत आहे. इथे टायरचा वापर करून ते वेगवेगळी वर्कआऊटचे फॉर्म करत आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : “प्रसिद्धी सहन होत नाही, कृपया माझा…”, Viral Video मधील धावणाऱ्या तरुणाची विनंती
आणखी वाचा : ही जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तीवर असतो कुबेराचा आशीर्वाद, कधीच जाणवत नाही पैशाची कमी
हा वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर करत यह टायर तो फायर निकला…लेकिन मैं थकेगा नहीं साला…लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
दरम्यान, अमोल कोल्हे स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत साकारली होती. याआधी ही ते बऱ्याच ऐतिहासिक मालिकांमध्ये दिसले होते.