करण जोहरच्या निर्मतीमध्ये बनलेला ‘लाइगर’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडे आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विजय याचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटासाठी खास स्क्रीनिंगसुद्धा आयोजित करण्यात आले आहेत. या चित्रपटाला बॉयकॉट करा असाही ट्रेंड सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चित्रपटाबाबत अभिनेता आणि समीक्षक केआरके याने ट्विट करून त्याचं मत व्यक्त केलं आहे. केआरके याने हा चित्रपट सपशेल आपटणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. त्याने ट्विट करत लिहिलं आहे की “निर्माता करण जोहरला स्वतःच्या चित्रपटाबद्दल फारच आत्मविश्वास आहे. म्हणूनच त्यांनी गुरुवारपासूनच या चित्रपटाचे पेड प्रिव्यूज आयोजित केले आहेत. करण जोहर यांना मी सांगू इच्छितो की त्यांचा चित्रपट फ्लॉप होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. कारण हा प्रेक्षकांचा आवाज आहे आणि हा आवाज स्वतः परमेश्वरदेखील रोखू शकत नाही.”

याआधीसुद्धा केआरके याने आमिर खानच्या चित्रपटाबाबत अशीच भविष्यवाणी केली होती. तसंच त्याने मध्यंतरी ‘लाइगर’विषयी एक खुलासा केला होता. केआरकेच्या मते करण जोहरने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मला विकायचा बराच प्रयत्न केला होता. पण हवी तितकी किंमत न मिळाल्याने करणने ओटीटीचा पर्याय बाद केला. बजेट बघता या चित्रपटाने १५० करोडचा बिझनेस करायला हवा पण ते शक्य नसल्याचं केआरकेचं म्हणणं आहे.

आणखीन वाचा : केआरके पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, स्वतःचं आडनाव काढून लावलं…

‘लाइगर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. या चित्रपटात जगप्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. हिंदी तामीळ तेलुगू आणि इतरही प्रादेशिक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्याबरोबरच रोनीत रॉय आणि रम्या कृष्णनसारखे कलाकारही आपल्याला बघायला मिळणार आहेत.