फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड अशा अनेक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसलेला अभिनेता अंकित मोहन नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. मराठीसह हिंदी मालिकेत झळकलेला अंकित मोहन हा काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला. तो नेहमी त्याच्या बाळाचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच अंकित मोहनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या लेकाचा एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अंकित मोहनने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक फोटो शेअर केली आहे. या फोटोत अंकित हा त्याचा मुलगा रुआनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला नमस्कार करायला शिकवत आहे. त्यासोबत अंकितने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओत रुआन हा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना दिसत आहेत.
या फोटोला कॅप्शन देताना अंकित म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज आज तुमचा लहान मावळा ७ महिन्यांचा झाला आहे. त्याच्यावर तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. रुआनला ७ महिन्यांच्या शुभेच्छा. बाळाला प्रेम आणि आशीर्वाद पाठवत राहिल्याबद्दल सर्वांचे आभार.”
अंकित हा त्याच्या मुलाला फार छान संस्कार देत आहे. तो कायमच रुआनसोबत घालवलेले अनेक क्षण चाहत्यांशी शेअर करत असतो. सध्या त्याच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात ‘जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दादा…’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने ‘मावळा’ असे म्हटले आहे.