५०० हून अधिक चित्रपटात काम केलेले ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे सध्या मुख्य प्रवाहापासून बरेच लांब फेकले गेले आहेत. अनुपम खेर हे नाव खरंतर चित्रपटसृष्टीतलं एक वजनदार नाव आहे. मात्र आज अनुपम फारसे चित्रपटात काम करताना दिसत नाहीत अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अनुपम खेर हे सध्या राजकीय गोष्टींमध्येच जास्त रममाण असतात असाही आरोप कित्येक चाहते त्यांच्यावर करत आहेत.

अनुपम खेर गेली काही वर्षं त्यांची राजकीय मतं अगदी परखडपणे मांडत आहेत. त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोलही करण्यात येतं. पण ते त्यांच्या विचारधारेशी अगदी प्रामाणिक असल्याचं बऱ्याच घटनांमधून समोर आलं आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”
Star Pravah New Serial Tu Hi Re Maza Mitwa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता साकारणार खलनायक! म्हणाला, “विक्षिप्त स्वभावाचं पात्र…”
Marathi actress Rupal Nand will appear in Tu Hi Re Maza Mitwa
ती पुन्हा येतेय! अभिजीत आमकर-शर्वरी जोगच्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेत ‘स्टार प्रवाह’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
pataal lok seson 2 new promo
Video : “मौसम बदलने वाला है…”; ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला प्रेक्षकांच्या भेटीला, हाथीराम चौधरीच्या मानेवरील ‘ती’ तारीख पाहून नेटकरी म्हणाले…
Bobby Deol And Dharmendra
“घरातील सर्व हँगर्स तोडून…”, ‘धरम वीर’ चित्रपटात काम केल्यानंतर बॉबी देओलने केलेली ‘ही’ गोष्ट; आठवण सांगत म्हणाला, “मला माझे पैसे…”

नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत आता चित्रपटसृष्टीकडून म्हणावं तसं काम मिळत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. आधी आदित्य चोप्रापासून करण जोहरच्या कित्येक चित्रपटात अनुपम खेर यांची महत्वाची भूमिका असायची. DDLJ, ‘कुछ कुछ होता है’ अशा कित्येक मुख्य प्रवाहातल्या चित्रपटात अनुपम खेर यांची महत्वाची भूमिका होती. पण सध्या या मोठ्या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटात ते आपल्याला दिसत नाही. याविषयी बोलताना अनुपम म्हणाले की “एकेकाळी मी त्यांचा अत्यंत लाडका होतो. पण आता गोष्टी बदलल्या आहेत.”

वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनुपम पुढे म्हणाले, “मी आता मुख्यप्रवाहाच्या चित्रपटांचा भाग नाही. मी सध्या करण जोहर किंवा साजिद नाडियादवालासारख्या मोठ्या लोकांबरोबर काम करत नाही, कारण मला तिथून कामासाठी ऑफर झालेलीच नाही. एकेकाळी आम्ही खूप घनिष्ट मित्र होतो. मी त्यांच्या कित्येक चित्रपटात काम केले आहे. आता ते मला चित्रपटात घेत नाही याचा दोष मी सर्वस्वी त्यांना देणार नाही. त्यांनी मला काम दिलं नसलं तरी मी माझा मार्ग शोधला आहे, मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करत आहे. जेव्हा एखादा दरवाजा बंद होतो तेव्हा दूसरा दरवाजा आपोआप उघडतो.”

अनुपम खेर नुकतेच विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’मध्ये दिसले होते. त्यांच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली. येणाऱ्या वर्षात अनुपम खेर हे कंगनाच्या ‘एमर्जन्सि’ या चित्रपटात जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट भारताच्या पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही खुद्द कंगनाच करणार आहे.

आणखी वाचा : काश्मीरची दुसरी बाजू समोर मांडणारी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित

याबरोबरच सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुरज बडजात्या हे खूप वर्षांनी दिग्दर्शनात उतरणार आहेत. त्यांच्या आगामी ‘उंचाई’ या चित्रपटात अनुपम खेर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अनुपम यांच्याबरोबर अमिताभ बच्चन, डॅनी डेंझोप्पा, सारिका असे कलाकारही पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader