अभिनेता अर्जुन कपूर हा नेहमीच चर्चेत असतो. तर गेल्या काही दिवसांपासून त्याला त्याच्या वक्तव्यांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तर मालयकाशी असलेल्या नात्याबद्दलही बऱ्याच गोष्टी गेल्या काही काळात बोलण्यात येत होत्या. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करत अर्जुन नुकताच परदेशात रवाना झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या प्रेमात पडलाय ‘हा’ अभिनेता, तिला डेट करण्याची व्यक्त केली इच्छा

अर्जुन कपूरचा काही महिन्यांपूर्वी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. मात्र, आधीच्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटाप्रमाणे हा दुसरा भाग चालला नाही. अर्जुन कपूर आता या सर्व गोष्टी विसरून त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच अर्जुन मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. तो लंडनला रवाना झाला आहे. तिथे तो त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. अर्जुनने स्वतः इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे. तर या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री भूमी पेडणेकरही दिसणार आहे.

त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोन स्टोरीज शेअर केल्या. त्याच्या पहिल्या स्टोरीत त्याचे विमानाचे तिकीट दिसत आहे. तर दुसऱ्या स्टोरीत ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटाचे पोस्टर दिसत आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांनी एकत्र काम केले होते. विमानात तो हा चित्रपट बघत होता. दुसऱ्या स्टोरीत त्याने अभिनेत्री परिणीती चोप्रालाही टॅग केली आहे आणि लिहिले, “बघा मला विमानात कोण भेटले,” मात्र, त्याच्या या पोस्टवर परिणीतीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आणखी वाचा : मलायका अरोरा – अरबाज खान पुन्हा येणार एकत्र ? फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अर्जुन कपूर शेवटचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसला होता. यामध्ये जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया असे लोकप्रिय कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. तर आता लवकरच तो ‘लेडी किलर’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तो अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor arjun kapoor off to london to shoot his new film rnv