विधानपरिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. यानंतर राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार धोक्यात येणार असे अनेक दावेही करण्यात येत आहेत. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान राज्यात राजकीय घटनांना उधाण आलेले असताना नुकतंच एका मराठी अभिनेत्याने एक ट्विट केले आहे. त्याचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.

मराठी अभिनेता आरोह वेलणकर हा नेहमी विविध राजकीय विषयांवर मत मांडताना दिसतो. सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडीवर आरोहने तीन ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आरोह वेलणकर याने नुकतंच एकनाथ शिंदेच्या ट्विटला रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे. त्यावर आरोह वेलणकरने रिट्विट करत ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’, असे ट्विट केले आहे.

Eknath Shinde Live Updates : काही काळ अडवल्यानंतर नार्वेकरांची गाडी हॉटेल मेरिडियनमध्ये दाखल; वाचा प्रत्येक अपडेट…

त्यासोबत आरोह वेलणकरने आणखी एक ट्विट केले आहे. “संपूर्ण राज्य आणि महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये झालेला गोंधळ आणि अनागोंदी पाहावी”, असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे. “अनेक मराठी वाहिन्यांवर एकनाथ शिंदेंसोबत १२ शिवसेना आमदार नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. नक्कीच काहीतरी मोठं घडणार”, असे ट्विट आरोह वेलणकरने केले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याची धारदार शस्त्राने हत्या, बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मेहुण्याने खून केल्याचा संशय

आरोहने काही तासांच्या अंतराने हे ट्विट केले आहेत. त्याच्या या ट्विटवर अनेक नेत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी आरोहला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील त्याचं अभिनयामुळे त्याला ‘घंटा’ हा चित्रपट मिळाला. या दोन्ही चित्रपटातील त्याच्या अभिनयाची चर्चा झाली. आरोहने ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकामध्येही काम केले आहे. त्यात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपट, रंगभूमी यासोबतच त्याने बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. त्यासोबत काही दिवसांपूर्वी आरोह हा लाडाची लेक गं या मालिकेतही झळकला होता.

Story img Loader