ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी दाखल होत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू केली. जवळपास १० तास चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं. संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. हे संपूर्ण प्रकरण ताज असतानाच अभिनेता आरोह वेलणकरने (Aroha Welankar) याबाबत ट्विट केलं आहे.
आणखी वाचा – “बालपणापासूनच मी संघ स्वयंसेवक” ‘पावनखिंड’च्या दिग्दर्शकांनी मोहन भागवतांबाबत शेअर केलेली पोस्ट चर्चेत
‘बिग बॉस’ मराठी या कार्यक्रमामुळे अभिनेता आरोह वेलणकर प्रकाशझोतात आला. सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणाऱ्या कलाकारांमध्ये आरोहचा नंबर टॉपला आहे. राजकीय मुद्द्यांवर देखील तो आपलं मत खुलेपणाने मांडताना दिसतो. मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींबाबत त्याने आपलं मत ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केलं.
आता संजय राऊत प्रकरणाबाबतही तो व्यक्त झाला आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्याने थेट संजय राऊत यांना मुळ मुद्द्याबाबत बोलायला सांगितलं आहे. “बाकी सगळं सोडा हो, पैसे खाल्ले की नाही यावर बोला, भ्रष्टाचार केला की नाही यावर बोला… काय?” असं ट्विट आरोहने केलं आहे. त्याच्या या ट्विटनंतर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा – “मी मशीन आहे का?” तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांबाबत स्पष्टच बोलली करीना कपूर खान
आरोहने हे ट्विट केल्यानंतर त्याला काहींनी ट्रोल देखील केलं आहे. “बाकी सगळं सोड पण तुझे चित्रपट का चालत नाही ह्यावर बोल” असं थेट एका युजरने कमेंट केली आहे. तर काहींनी आरोहला ट्विट न करण्याचा सल्ला दिला आहे.