आमिर आणि अतुल कुलकर्णीची मैत्री हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत सर्वांनाच माहित आहे. आमिरप्रमाणेच अतुलही परिपूर्णतेसाठी ओळखला जाणारा कलाकार आहे. प्रत्येक चित्रपटातील आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय देण्यासाठी आणि त्या भूमिकेत पूर्णपणे उतरण्यासाठी तो जीवाचे रान करतो. आपल्या कलेत सर्वोत्तम उतरण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक समर्पणही आहे. ‘हॅप्पी जर्नी’ या नवीन चित्रपटातील त्याच्या नव्या भूमिकेतही हीच बाब नव्याने समोर आली आहे.
हॅप्पी जर्नी’ ची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने केली असून या चित्रपटाचे चित्रीकरण गोवा, पुणे, वेल्हे आणि मांणगाव अशा विविध ठिकाणी केले जात आहे. या नव्या चित्रपटासाठी एक विशेष गाडी (हाऊस ऑन व्हील्स) तयार केली गेली आहे. मात्र, अतुल कुलकर्णीला गाडी चालवता येत नव्हती. पण चित्रपटात त्याला ही गाडी मोठ्या प्रमाणावर चालवायची होती. आपल्या अभिनयात सहजता यावी आणि कोणत्याही अडचणीशिवाय गाडी चालवता यावी, यासाठी अतुलने गाडीचे प्रशिक्षण घेतले. केवळ प्रशिक्षण घेऊनच तो थांबला नाही तर ती आरामात चालवता यावी. म्हणून अतुलने पुणे ते गोवादरम्यान या गाडीतून अनेक फे-याही मारल्या. रस्त्यात काही ठिकाणी थांबत त्याने सराव केला. अतुल कुलकर्णी हा मराठी चित्रपटसृष्टीतला मि.परफेक्टशनिस्ट असल्याचे म्हणावयास काहीच हरकत नाही.

(छाया सौजन्यः अतुल कुलकर्णी फेसबुक पेज)

Story img Loader