अभिनेते अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी दिलेला लढा आणि त्यांना त्या दरम्यान आलेला अनुभव हा त्यांनी सांगितला आहे. कॅन्सरच्या दरम्यान डॉक्टरांकडून आलेले अनुभव, मनात येणारे विचार, सकारात्मक विचारांनी स्वतःला त्यांनी स्वतःला कसं दूर ठेवलं आहे हे सगळं अतुल परचुरेंनी सांगितलं आहे.

कॅन्सर कशाला होईल असंच मला वाटलं होतं

कॅन्सर आपल्याला कशाला होईल? असं आपल्याला वाटत असतं. असंच मलाही वाटत होतं. आमच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस होता म्हणून आम्ही सगळे न्यूझीलँडला गेलो होतो. तिथे मला खाण्याचा नॉशिया येऊ लागला. बाकी सगळं नीट चाललं होतं. पण खायचं म्हटलं की नॉशिया येऊ लागला. मला हे वाटणं ही माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे असं वाटलं. त्यानंतर वाटलं की कावीळ झाली आहे. मग तिथल्या माझ्या एका डॉक्टर मित्राने मला सांगितलं की आपण अल्ट्रा सोनोग्राफी करुन बघू. अल्ट्रा सोनोग्राफी केली. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव मला समजत होते, त्यावेळी मला कळलं की ही कावीळ नाही त्यापेक्षा गंभीर काहीतरी झालं आहे असं म्हणत अभिनेता अतुल परचुरेने आपण कॅन्सरला लढा कसा दिला ते सांगितलं आहे. युट्यूबवरच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्ट या कार्यक्रमात सौमित्र पोटेंनी घेतलेल्या मुलाखतीत अतुल परचुरे यांनी त्यांच्या कॅन्सरचं आणि त्याच्याशी हिंमतींने जो सामना केला ते सांगितलं आहे.

sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
What Ajit Pawar Said About Nawab Malik?
Ajit Pawar : “नवाब मलिकांना ३५ वर्षे ओळखतो ते दाऊदची साथ…”; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…

आणखी काय म्हणाले अतुल परचुरे?

मी दुसऱ्या दिवशी जेव्हा सिटी स्कॅन करण्यासाठी डॉक्टरांकडे गेलो तेव्हाही डोक्यात नव्हतं की आपल्याला कॅन्सर वगैरे असेल. सिटी स्कॅन केल्यानंतर मला डॉक्टर म्हणाले उद्या आपण MRCP करु. मी त्यांना विचारलं डॉक्टर सांगा ना काय झालं आहे? तर डॉक्टर म्हणाले उद्या कळेलच आपल्याला सगळं. ती टेस्ट केली, त्यानंतर मला समोर बसवलं. ते मला म्हणाले की आता वारंवार काही शब्द ऐकायची तयारी ठेवा. डॉक्टर मला म्हणाले की तुमच्या लिव्हरमध्ये आम्हाला एके ठिकाणी ट्युमर दिसतो आहे. तो ट्युमर साधारण पाच सेमीचा आहे. तुम्ही काळजी घ्या. मी तेव्हा त्यांना विचारलं की मॅलिग्नंट आहे का? म्हटलं म्हणजे कॅन्सर झाला आहे का? तर ते म्हणाल हो. मी त्यांना विचारलं की मी यातून बाहेर पडू शकतो का? तर डॉक्टर मला म्हणाले की मी तू बाहेर पडशील पण माझ्यापेक्षा तुला कॅन्सर स्पेशालिस्ट हे जास्त चांगल्या पद्धतीने चांगलं सांगतील. त्यानंतर मी ते रिपोर्ट घेऊन घरी आलो. सोनियाला मी सांगितलं होतं की ट्युमर वगैरे आहे. पण घरी आल्यानंतर मी सर्वात आधी आईला सांगितलं. डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की कॅन्सर आहे. तर आई म्हणाली हो? मग डॉक्टर काय म्हणाले? मी आईला सांगितलं की डॉक्टर म्हणत आहेत की दोन-तीन प्रोसिजर्स आहेत ते झालं की तुमच्या लिव्हरची साईझ वाढेल मग आपण ते काढून टाकू. काढून टाकू म्हणालेत ना डॉक्टर मग लक्षात ठेव तुला काहीच होणार नाही काळजी करु नकोस मला आईने सांगितलं. सोनियाला कॅन्सर झाल्याचं सांगितलं तेव्हा ती पण हेच म्हणाली की तुला काहीच होणार नाही. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली की तुमची कशावर तरी श्रद्धा हवी. मग ती पुस्तकावर असो, देवावर असो, स्वामी समर्थांवर असो, येशूवर, अल्लावर कुणावरही असो पण ती हवी आणि १०० टक्के हवी. माझी आई, बायको आणि माझी मुलगी या माझ्या तीन सपोर्ट सिस्टिम आहेत. माझी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे.

माझी सपोर्ट सिस्टिम म्हणजे माझं कुटुंब

माझा रिपोर्ट आल्यापासून आजच्या दिवसापर्यंत मला घरातल्या कुणीही मी आजारी आहे असं वागवलंच नाही. मी २९ डिसेंबरला एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालो. पहिलं प्रोसिजर झालं. मला काय झालं ते सांगता येत नाही पण ती प्रोसिजर चुकली. मेडिकल प्रुफ माझ्याकडे नाही पण मला आतून असं वाटलं. कारण त्यातून मला पॅनिक्रिटायटिस झाला. मी आता त्या ब्लेमगेम मध्ये पडत नाही. पण तेव्हा अवस्था वाईट झाली होती. मी चक्कर येऊन पडलो. चार दिवसांनी घरी आलो. मला काय झालं ते माहित नाही. दुसरं प्रोसिजर झालं, त्यानंतर तिसरं प्रोसिजर झालं. मग मला ते म्हणाले की आता दीड महिना थांबायचं. त्यानंतर ऑपरेट करता येईल का पाहू. दीड महिन्याने आम्ही गेलो तेव्हा ते डॉक्टर म्हणाले की आपल्याकडे प्रॉब्लेम आहे पण सोल्युशन नाही. १५ मार्च पर्यंतचा प्रत्येक दिवस हा पहिल्यापेक्षा वाईट होता. त्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या. या सगळ्या प्रवासात संजय नार्वेकर आणि विनय येडेकर हे सावलीसारखे माझ्या बरोबर होते. मी ११ वाजता झोपलो की मला ११.१५ ला जाग यायची. डोळे उघडले की किती वाजलेत कळायचं इतकं सगळं पाठ झालं होतं. त्या रुग्णालयात तीन डॉक्टर ट्रिट करत होते. त्या रुग्णालयाचं नाव मी आता घेत नाही. आम्हाला त्यावेळी काहीच कळत नव्हतं. अशा वेळी तुमचे मित्रही तुम्हाला निर्णय देतात पण किती लोकांचं तुम्ही ऐकणार? आज माझ्या मित्रांनी मला प्रचंड साथ दिली.

माझे पाय सुजाचये, अन्न जायचं नाही

माझे पाय सुजायचे, अन्न जायचं नाही, एक घास खाल्ला की एक घोट पाणी प्यावं लागायचं, घसा सुकायचा हे सगळं मी सहन केलं असंही अतुल परचुरेंनी सांगितलं. हे सगळं का झालं? मला नाही सांगता येणार. त्यानंतर सोनियाने माझ्यासाठी निर्णय घेतला. आम्ही डॉक्टर बदलले. सोनिया माझ्या बरोबर होतीच. आम्ही सेकंड ओपिनियन घेतलं. माझ्या आयुष्यात दोन देवदूत आले. महेश मांजरेकर आणि मंगल केंकरे. मंगलने माझे रिपोर्ट एका होमिपॅथी डॉक्टरला पाठवले होते. त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले हे किरकोळ आहे तुम्ही यातून बाहेर पडाल. त्यांच्या या शब्दांनीच मला धीर दिला. मी डिप्रेस झालो नव्हतो, हे मलाच का झालं? मी बाहेर पडेन माहित होतं पण कसा हा प्रश्न होता. ते म्हणाले की मी सर्जन नाही पण ट्युमर या स्टेजला आणेन की जसा डायबेटिस असतो, ब्लड प्रेशर असतं त्या लेव्हलला मी आणेन.

मला आई म्हणाली तुझ्या हॅलोवरुन सगळं कळलं

माझी एक मैत्रीण आहे अपर्णा लिमये तिने मला रिलायन्स हॉस्पिटलच्या सौमिल व्यास यांना भेटण्याचा सल्ला दिला. पुण्याहून मी त्यांना भेटलो. त्यांना माझे रिपोर्ट्स मिळाले होते. मला ते म्हणाले की मी तीन स्टेज करणार. रोबोटिक सर्जरी करणार असं सांगितलं. चार प्रोसिजर केल्या त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली. डॉक्टरांना भेटल्यावर आम्ही रिलायन्समधून बाहेर पडलो. सोनियाने घरी फोन केला माझ्या आईला. आई म्हणाली तुझ्या हॅलो वरुन मला समजलं की तुझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना? घरी ये आपण सविस्तर बोलू. इतकी ताकद माझ्या मागे होती. त्यामुळे मी घाबरलो नाही, माझ्या मनात कधी निराशा आलीच नाही. मी घरी आल्यावर आई स्वयंपाक करत होती तिने जेवण वाढलं मी जेवलो आणि झोपलो. जेवण वगैरे कमी झालं होतं. नॉशिया येतच होता, केमो थेरेपी, औषधं सगळं सुरुच होतं. मला इतक्या लोकांनी मला फोन करुन सांगायचे की तुला काहीही लागलं तर फोन करायचा आणि अमाऊंट सांग इतकंही मित्र सांगायचे. किती लोक मला पाठींबा देत होते मला सांगताच येणार नाही असंही अतुल परचुरेंनी म्हटलं आहे आणि आपला कॅन्सरशी केलेला लढा उलगडला आहे.