देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. नुकतंच अभिनेते बोमन इराणी यांचा मुलगा कायोज इराणी याला करोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
कयोज इराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यावर तो म्हणाला, “माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दारु नाही, मांसाहार नाही आणि सामाजिकता नाही (पण मी हे शब्द बोलेन असे कधीही वाटले नव्हते). लक्षणे आहेत, पण ते काहीही मजेशीर नाही. कृपया बाहेर पडण्यापूर्वी सर्व खबरदारी घ्या. खंबीर राहा आणि २०२२ मध्ये भेटू.”

बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी हा चित्रपट निर्माता आहे. कयोज इराणी यांनी नेटफ्लिक्सचा ‘अनकही’ चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘अनकही’ या चित्रपटात शेफाली शाह आणि मानव कौल मुख्य भूमिकेत आहेत.
Video: प्रदर्शन करण्याची गरज काय? लिपलॉक व्हिडीओमुळे शेफाली-पराग झाले ट्रोल
दरम्यान गेल्या काही दिवसांत अर्जुन कपूर, नोरा फतेही, शिल्पा शिरोडकर, करीना कपूर, अमृता अरोरा यांच्यासह अनेक कलाकारांना करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान हे सर्व कलाकार गेल्या काही दिवसांपासून अनेक पार्टी करताना आढळले होते. दरम्यान यातील करीना कपूर आणि अमृता अरोरा करोना निगेटिव्ह झाले आहेत.