बॉलिवूड अभिनेता बोमन इराणी यांचा मुलगा दानिश विरुद्ध ४२५ कोटी रुपयांच्या ‘क्यूनेट’ घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी समन्स बजावला आहे. दानिश याच्यावर मलेशिया स्थित ‘क्यूनेट’ या मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या समन्सद्वारे दानिशला या प्रकरणी तपास करत असलेल्या ‘इओडब्ल्यू’समोर शुक्रवार पर्यंत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
“आम्ही दानिशला २४ जानेवारी पर्यंत आमच्यासमोर हजर होण्याचा समन्स बजावला आहे,” असे मुंबई पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे(इओडब्ल्यू) सहाय्यक पोलिस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी सांगितले.
‘इओडब्ल्यू’ने नुकतेच दानेशचे बॅंक खाते गोठवले आहे. इओडब्ल्यूला दानिशच्या खात्यामध्ये २५ लाख रूपये असल्याचे आढळले होते. या तपासामध्ये दानिशच्या खात्यामध्ये क्युनेट कडून ४० लाख रूपये जमाकरण्यात आल्याचे निष्पंन्न झाले आहे. दानिशचे या ‘क्युनेट’शी काय संबंध आहेत व त्याला दलालीच्या माध्यमातून ‘क्युनेट’कडून किती अर्थप्राप्ती झाली आहे याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला ‘इओडब्ल्यू’ने गुरप्रित आनंदच्या ‘क्यूनेट’ संदर्भातील तक्रारीवरून अभिनेता बोमन इराणी आणि त्याचा मुलगा दानेशविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, आपण किंवा आपल्या मुलाने कोणताही गैरप्रकार केला नसल्याचा खुलासा बोमन इराणीने केला आहे.                  

Story img Loader