दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये चिरंजीवी हे सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव आहे. चिरंजीवी यांनी तेलुगू, तामिळ आणि कन्नड या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी हे सध्या त्यांच्या ‘आचार्य’ चित्रपटाचे प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आमच्या कुटुंबाची ओळख ही बॉलिवूडमधील कपूर कुटुंबाप्रमाणे व्हावी, अशी इच्छा चिरंजीवी यांनी एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केली आहे.
चिरंजीव यांचे भाऊ पवन कल्याण यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले, “बॉलिवूडमध्ये ज्याप्रकारे कपूर कुटुंब आहे, त्याच प्रकारे आपल्या कुटुंबाला दाक्षिणात्य चित्रपटातील कपूर या नावाने ओळखले जावे. मला हिंदी चित्रपट प्रचंड आवडतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या परिवारबद्दल लोकांमध्ये हाच दृष्टीकोन असायला हवा, असे मला वाटते. माझी मुले पवन कल्याणपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत इतर सर्वजण सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहे. याचा मला फार आनंद आहे.”
इलॉन मस्कने दीपिका पदुकोणसाठी केले होते ट्विट, हार्ट इमोजी पाहून अभिनेत्री म्हणाली…
“कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील असे एकमेव कुटुंब आहे, ज्यांच्या चार पिढ्या सिनेसृष्टीत योगदान देत आहेत. पृथ्वीराज कपूरपासून ते शम्मी कपूर, राज कपूर यानंतर ऋषी कपूर आणि रणधीर कपूर या सर्वांनीच बॉलिवूडमध्ये त्यांची छाप पाडली आहे. यानंतर आता कपूर घराण्यातील करीना कपूर खान आणि रणबीर कपूर यांचे हिंदी चित्रपटसृष्टीवर वर्चस्व आहे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान चिरंजीवी हे लवकरच ‘आचार्य’ या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यासोबत ते सध्या ‘गॉडफादर’ या चित्रपटाचे शूटींग करत आहेत. या चित्रपटात चिरंजीवीसोबतच सलमान खान झळकणार आहे. ‘गॉडफादर’ हा पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. सलमान आणि चिरंजीवीशिवाय नयनतारा, सत्यदेव कंचरण, जय प्रकाश हे कलाकार दिसणार आहेत.
“…आता मराठी चित्रपट १०० कोटींच्या घरात जायला वेळ लागणार नाही”, चिन्मय मांडेलकरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
या चित्रपटात अनुष्का शेट्टी, राम चरण आणि श्रुती हासन देखील दिसणार आहेत. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनने दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला. ‘गॉडफादर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा करणार आहेत. हा चित्रपट मल्याळम सुपरहिट चित्रपट ‘लुसिफर’चा रिमेक असेल. सलमान या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका लूसिफरमधील पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासारखीच असणार आहे. या चित्रपटात पृथ्वीराज यांनी छोटी भूमिका केली होती.