दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी आली आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेता डॅनियल बालाजीचं शुक्रवारी (२९ मार्च) निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. या दुःखद घटनेमुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टुडे’ च्या वृत्तानुसार, ४८ वर्षीय डॅनियलने शुक्रवारी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, नंतर त्याला चेन्नईतील कोटिवाकम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी पुरसाईवालकम येथील त्याच्या घरी नेण्यात आले आहे. डॅनियलच्या आकस्मिक निधनाने त्याच्या कुटुंबियांसह, चाहत्यांना आणि तमिळ सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ

डॅनियलने २००२ मध्ये ‘एप्रिल मधाथिल’ या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गौतम मेनन आणि सुर्या-ज्योतिका यांच्या ‘काखा काखा’ने चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळाली. वेत्री मारनच्या ‘पोल्लाधवन’मध्येही तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता. त्याने ‘वेट्टय्याडू विलाय्याडू’, ‘येन्नई अरिंधाल’, ‘अच्छाम येनबधू मदामैयादा’, थलपथी विजयच्या ‘बैरवा’, धनुषच्या ‘वाडा चेन्नई’ आणि विजयच्या ‘बिगिल’ सिनेमांमध्ये काम केलं होतं. ‘आरियावन’ हा त्याचा शेवटचा सिनेमा होता.

घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहचा पहिला पती म्हणाला, “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”

डॅनियल बालाजी हा उत्तम अभिनेता होता. त्याने फक्त तमिळच नाही तर इतर दाक्षिणात्य भाषेतही चित्रपटही केले होते. त्याने मल्याळम, कन्नड व तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं होतं. डॅनियलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर चाहते त्याला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor daniel balaji passes away of heart attack hrc