माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं या खेळाच्या आठवणी अनेकांच्या स्मृतीरंजनात असतील. मात्र काळाच्या ओघात हा खेळ हरवून गेला आणि ते पत्रसुद्धा. खरं तर एक छोटा कागदाचा कपटा, पण पत्रामध्ये, दोन शब्दांमध्ये, दोन रेषांमध्ये कितीतरी अव्यक्त गोष्टी दडलेल्या असत. हल्ली पत्रप्रपंच कमी झाला असला तरी काही पत्रांच्या आठवणींचा दरवळ मात्र मनात चिरंतन दरवळतो. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेल्या पत्रांचा दरवळ आणि त्याची आठवण आजही दिलीप प्रभावळकर यांच्या मनात रुंजी घालतायेत. त्यामुळेच तर पत्रापत्री या नाटकाच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

श्रीराम लागूंच्या पत्राच्या आठवणी

‘हसवाफसवी’ हे नाटक पहिल्यानंतर डॉ.श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिलं. या पत्राच्या आठवणी आजही चांगलं काम करायला बळ देतात असं सांगताना, नाट्यरसिकांसाठी दिलीप प्रभावळकर यांनी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे, त्यासही नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाचे प्रयोग सध्या जोरदार सुरु आहेत. यासाठी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांची त्यांना साथ लाभली आहे. आणि आज पत्रात्मक संवाद कालौघात मागे पडलेला असताना बदामराजा प्रोडक्शन्स निर्मित ‘पत्रा पत्री’ हा रंगाविष्कार मंचावर येणं नाट्यरसिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळणे हे निश्चितच उत्सुकता वाढवणारं आहे. माधुरी गवांदे, निनाद कर्पे याचे निर्माते आहेत.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
Actor Dilip Prabhavalkar
पत्रापत्री या नाटकाचा प्रयोग सादर करताना अभिनेते दिलीप प्रभावळकर

हे पण वाचा- नाट्यरंग : जगण्यातील विसंगतींची खुसखुशीत चित्र

दिलीप प्रभावळकर या नाटकाबाबत काय म्हणाले?

दिलीप प्रभावळकर याविषयी म्हणाले, पत्रलेखनामधील ओलावा आणि आपलेपणाची अनुभूती रसिकांना देण्यासाठी ‘पत्रा पत्री’ चा प्रयोग करण्याचं ठरवलं. ‘प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीचं लेखन या पत्रांमध्ये आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. अशा पाच कथा आम्ही अभिवाचनासाठी निवडल्या आहेत.’ तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा बनून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचं अभिवाचन करत आहेत. या ‘दृक आविष्कारा’चं दिग्दर्शन विजय केंकरे यांचं असून रंगावृत्ती नीरज शिरवईकर यांची आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. या प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दिलीप प्रभावळकर हे एक प्रयोगशील अभिनेते आहेत. त्यांनी आजवर चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत.