२००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने पहिल्या भागात केलेली हीच धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. मनोरंजनाचा डबल डोस घेऊन ‘दे धक्का २’ चित्रपट आज शुक्रवारी (५ ऑगस्ट) पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याच चित्रपटानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मराठी चित्रपटांबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : लग्नापूर्वीच लंडनला गेलेल्या राणादा-पाठकबाईंचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, मराठमोळ्या कपलची चर्चा

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

सध्या मराठीमध्ये विनोदी ते ऐतिहासिक अशा विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जातात का? मराठी चित्रपटांची सध्या परिस्थिती काय? याबाबत महेश मांजरेकर यांनी सांगितलं. एका प्रमोशनल कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

“मराठीमध्ये चांगले चित्रपट प्रदर्शित होत नाहीत असं काहीच नाही. पण प्रेक्षक आहेत कुठे? तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण ते मत मांडण्यापूर्वी एकदा तरी चित्रपट पाहा. मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहण्यासारखे नसतात हे प्रेक्षकांनी ठरवूनच ठेवलं आहे. निर्माते-दिग्दर्शक वेगवेगळ्या कथा, विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू पाहतात त्यांच्यासाठी खरंच हे अतिशय वेदनादायी आहे.” असं महेश मांजरेकर यांनी यावेळी म्हटलं.

आणखी वाचा – अमृता फडणवीसांनी खरंच प्लास्टिक सर्जरी केली आहे का? म्हणाल्या, “लग्नाआधी ब्युटी पार्लरला देखील गेले नाही आणि…”

पुढे म्हणाले की, “पण तेच प्रेक्षक आनंदाने दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जातात. या चित्रपटांना मिळत असलेल्या यशाबाबत माझं काहीच म्हणणं नाही. काही चित्रपट चांगल्या आशयाचे नसतानाही दाक्षिणात्य चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांची उत्तम जाहिरात करत उत्तम पैसे कमावतात.” प्रेक्षक मराठी चित्रपट पाहण्यासाठी जात नसल्याची खंत महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.

Story img Loader