बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते फारूख शेख यांचे शुक्रवारी रात्री हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  ६५ वर्षीय शेख हे  कुटुंबासमवेत दुबईला गेले होते. त्याचवेळी त्यांचे निधन झाले.
फोटो गॅलरीः फारुक शेख यांच्या कारकिर्दीवर एक झलक
शेख यांनी बॉलिवूडमधील १९७० ते १९८० या काळात अनेक प्रसिद्ध चित्रपटात भूमिका केली होती. त्यांची ‘शतरंज के खिलाडी’, ‘चष्मे बद्दूर’, ‘किसी से ना केहना’, ‘नुरी’ या चित्रपटात भूमिका विशेषरित्या वाखाणण्यात आली होती.  शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्यासोबतच्या चित्रपटांना तर चांगलीच प्रशंसा मिळाली हती. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जवानी है दिवानी’ या चित्रपटात त्यांनी शेवटची भूमिका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा